Dam Water Release : नाशिकमध्ये ११ धरणांतून विसर्ग सुरू

Rain Alert : भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त अंदाजानुसार पुढील पाच दिवस म्हणजे ५ ते ९ जुलै या कालावधीत जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
Dam Water Release
Dam Water ReleaseAgrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी असून जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामध्ये त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी (ता. ६) एकूण ८ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. संततधारेने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने ११ धरणांतून विसर्ग सोडण्यात येत आहे.

भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त अंदाजानुसार पुढील पाच दिवस म्हणजे ५ ते ९ जुलै या कालावधीत जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून सूर्यदर्शन नसून ढगाळ वातावरण कायम आहे. त्यातच सकाळपासून पाऊस सुरू असल्याने सर्वत्र परिसर जलमय झाला.

Dam Water Release
Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

घाटमाथाच्या परिसरात पावसाचा जोर कायम आहे. यात पश्चिम पट्ट्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ व सुरगाणा येथे जोरदार यासह नाशिक, सिन्नर, निफाड या तालुक्यांतही मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. इतर तालुक्यांत कमी-अधिक पाऊस आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याची आवक वाढल्याने आता विसर्ग वाढवला जात आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी व सतर्क राहण्याच्या सूचना जलसंपदा विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.

Dam Water Release
Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

दारणा व गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणी नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात येत असल्याने ३११३५ क्युसेक विसर्ग पुढे गोदापात्रात जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांत अतिवृष्टीमुळे शेताचे बांध फुटले आहेत. तर रस्त्यांची चाळण झाली आहे. तर भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भात रोपांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काही ठिकाणी ओल्या दुष्काळाचे सावट असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

धरणातून पाणी विसर्गाची स्थिती :

धरण...विसर्ग (क्युसेक)(ता. ६, दु. ३ वा.)

दारणा : ९,९३२

गंगापूर...५,१८६

पालखेड...६४६

पुणेगाव...१५०

भोजापूर...७६

भावली...९४८

भाम...४,४७०

वाकी...१,०४१

वालदेवी...६५

आळंदी...३०

कश्यपी...५००

मुकणे...४००

(संदर्भ : जलसंपदा विभाग)

या महसूल मंडलांत अतिवृष्टी (कंसात पाऊस मिमी) :

इगतपुरी ः नांदगाव(६५), वाडीवऱ्हे (६५)

पेठ ः पेठ (६६.५), कोहोर (६६.५), कारंजाळी (६६.५)

त्र्यंबकेश्वर ः त्रंबकेश्वर (८२), वेळुंजे (८२), ठाणेपाडा (९१)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com