Watermelon Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड रखडली

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कलिंगडाची लागवड पावसाने रखडली आहे. लागवड यंदा वाढणार असून, सुमारे ३०० हेक्टरवर कलिंगड पीक ऑगस्टअखेर राहील, अशी स्थिती आहे. कलिंगडाची खरिपातील लागवड खानदेशात तीनही जिल्ह्यांत केली जाते. जळगाव जिल्ह्यात जामनेरमध्ये सर्वाधिक लागवड असते.

जामनेरात ७० हेक्टरवर पावसाळी किंवा खरिपातील कलिंगड लागवड पूर्ण झाली आहे. नंदुरबारातील तळोदा, शहादा भागातही लागवड केली जात आहे. या भागातील लागवड ३० टक्केही झालैली नाही. कारण पाऊस सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यातही लागवड यंदा स्थिर राहील. मागील हंगामात जुलै ते ऑगस्ट या कालावधीत कलिंगडाची लागवड झाली होती. एकूण लागवड २०० हेक्टरपेक्षा अधिक झाली होती. परंतु यंदा पावसामुळे लागवड रखडत सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर, चोपडा भागांत लागवड अधिक होणार आहे. अन्य भागांत मात्र लागवड कमी होते.

आतापर्यंत खानदेशात मिळून २०० हेक्टरवर कलिंगड लागवड झाल्याचा अंदाज आहे. ही लागवड या महिन्यातही शेतकरी करतील. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही लागवड होईल. पावसामुळे अनेक जण सध्या लागवड टाळत आहेत. बिया व रोपे लागवड शेतकरी करतात. ही लागवड मात्र नुकसानीच्या भीतीने केली जात नसल्याची स्थिती आहे.

कलिंगडाची लागवड या महिन्यात पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. परंतु आता उर्वरित लागवड पुढील महिन्यात होईल, अशी माहिती मिळाली. खपरिपातील कलिंगडासाठी खानदेशात जामनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा व शहादा हा भाग प्रसिद्ध आहे. यात एकट्या जामनेरातील लागवड १०० हेक्टरपेक्षा अधिक केली जाते.

यंदा जामनेरातील लागवड जूनमध्ये अधिक झाली आहे. जामनेरातील हिवरखेडा, पळासखेडा, हिंगणे, नेरी, जामनेर, सामरोद, गारखेडा, तोंडापूर व अन्य भागांत कलिंगडाची मोठी लागवड करण्यात येते. चोपड्यातही माचले, गोरगावले, सनपुले, लोणी, पंचक, यावलमधील डांभुर्णी, किनगाव, साकळी व परिसरात कलिंगड पीक असते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dhananjay Munde : उद्याच कापूस आणि सोयाबीनचं अनुदान ६५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंची पुन्हा ग्वाही

Bogus Fertilizer : बोगस निविष्ठा प्रकरणात कृषी विभागाची भूमिका संशयास्पद

Cotton Productivity : सघन कापूस लागवड उत्पादकता वाढीस पूरक

Rabi Season 2024 : रब्बीसाठी तीन लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

Agriculture Awards : सरकारच्या कृषी पुरस्कार गोंधळ; शेतकऱ्यांच्या रोषानंतर कार्यक्रम सुरू

SCROLL FOR NEXT