Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड सुरू; खरबूज लागवड अल्प

Muskmelon Cultivation : रब्बीत कलिंगडाची लागवड खानदेशात नंदुरबारातील तळोदा, शहादा भागांत अधिकची घटली होती. खरिपात मात्र लागवड किंचित वाढणार आहे.
Watermelon
WatermelonAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात कलिंगडाची लागवड सुरू झाली आहे. लागवड यंदा काहीशी वाढणार असून, सुमारे १०० ते ११० हेक्टरवर कलिंगड पीक राहील, असे दिसत आहे. खरबुजाची लागवड मात्र यंदा अल्प आहे. रब्बीत कलिंगडाची लागवड खानदेशात नंदुरबारातील तळोदा, शहादा भागांत अधिकची घटली होती.

खरिपात मात्र लागवड किंचित वाढणार आहे. अनेकांनी गणेशोत्सव, नवरात्रीच्या कालावधीत आवक किंवा काढणी होईल, या दृष्टीने लागवडीचे नियोजन केले आहे. जळगाव जिल्ह्यातही लागवड बऱ्यापैकी आहे. मागील हंगामात जिल्ह्यात मागील वेळेस खरिपात जुलै व ऑगस्ट या कालावधीत कलिंगडाची लागवड झाली होती. एकूण लागवड ७५ हेक्टरपेक्षा अधिक झाली होती. परंतु यंदा खानदेशातील लागवड २५ ते ३५ हेक्टरने वाढणार आहे.

Watermelon
Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

काही शेतकऱ्यांनी दसरा सणाला आवक होईल, या दृष्टीने नियोजन केले आहे. लागवड जळगाव जिल्ह्यातील जामनेर, चोपडा, जळगाव, धुळ्यातील धुळे, नंदुबारातील शहादा, तळोदा होत आहे. अन्य भागात मात्र लागवड अनेकांनी टाळली आहे. आतापर्यंत खानदेशात मिळून ४० हेक्टरवर कलिंगड लागवड झाल्याचा अंदाज आहे. ही लागवड पुढील महिन्यातही काही शेतकरी करतील.

Watermelon
Khandesh Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड सुरू

कलिंगडाची लागवड या महिन्यात ७० ते ७५ हेक्टरवर होईल. तर पुढील महिन्यातील लागवड २५ ते ३५ हेक्टर एवढी राहील, अशी माहिती मिळाली. कलिंगडासाठी खानदेशात जामनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा व शहादा हा भाग प्रसिद्ध आहे. यात एकट्या जामनेरातील लागवड २० ते २२ हेक्टरवर राहील. जामनेरातील हिवरखेडा, पळासखेडा, हिंगणे, नेरी, जामनेर, सामरोद, गारखेडा, तोंडापूर व अन्य भागात कलिंगडाची लागवड करण्यात येते.

चोपड्यातही माचले, गोरगावले, लोणी, पंचक, यावलमधील डांभुर्णी, किनगाव, साकळी व परिसरात कलिंगड पीक असते. या भागतही लागवड यंदा कमी झाल्याचे सांगण्यात आले. खानदेशात कलिंगड लागवड वाढू लागली आहे. मध्य प्रदेशातील जळगावलगतच्या भागात लागवड वाढली आहे. तेथील बऱ्हाणपूरातील इच्छापूर, नाचणखेडा, दापोरी, फोपनार, लोणी व तापीकाठालगत लागवड केली जात असल्याची माहिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com