Watermelon Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड सुरू

Watermelon Farming in Khandesh : खानदेशात खरिपातील किंवा पावसाळी कलिंगडाची लागवड सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला लागवड केली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात खरिपातील किंवा पावसाळी कलिंगडाची लागवड सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला लागवड केली आहे. यंदा नंदुरबारात लागवड कमी झाल्याची माहिती असून, खानदेशातील एकूण क्षेत्र १५० ते २०० हेक्टरवर राहील, असा अंदाज आहे.

खानदेशात खरिपातील कलिंगडाची लागवड कमी केली जाते. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुका कलिंगड लागवडीत आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ चोपडा, जळगाव, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारातील तळोदा, शहादा भागात कलिंगडाची लागवड केली जाते. कलिंगडास अखेरच्या १५ ते २० दिवसांत अधिकचे पाणी सिंचनासाठी लागते. रोज पाच ते सहा तास सिंचन करावे लागते.

यामुळे कमीअधिक पावसाच्या भीतीने कलिंगडाची लागवड यंदा कमी होईल, अशी स्थिती आहे. परंतु चोपडा, यावल भागांत लागवड स्थिर राहणार आहे. जामनेरातील लागवडही स्थिर आहे. अनेक शेतकरी जुलैच्या मध्यात लागवड करतात. लागवडीसाठी काही शेतकरी रोपांचा उपयोग करीत आहेत.

तर काही शेतकरी बियांची लागवड करीत आहेत. धुळ्यात धुळे, शिरपूर भागांत काही शेतकरी लागवड करतात. धुळ्यातही क्षेत्रात मोठी घट किंवा वाढ झालेली नाही. जळगाव व धुळ्यात मिळून सुमारे १५० ते २०० हेक्टरवर कलिंगडाचे पीक असणार आहे. त्याची लागवड ऑगस्टपर्यंत केली जाईल.

नंदुरबारात मागील हंगामात सुमारे २५ हेक्टरवर खरिपातील कलिंगडाची लागवड झाली होती. परंतु यंदा तेथील लागवड सुमारे पाच ते सहा हेक्टरने कमी होणार आहे. मागील हंगामात कलिंगडाचे नुकसान विषम वातावरणासह विविध रोगांमुळे झाले होते.

त्यात शेतकऱ्यांनी ६० ते ७० हजार रुपये खर्च केला होता. हा खर्चही अनेकांचा वाया गेला होता. कलिंगडाचे पीक नाजूक व अधिक श्रमाचे आहे. त्यात दैनंदीन विद्राव्य खते, आवश्यकतेनुसार एक दिवसाआड फवारणी घ्यावी लागते.

यामुळे मोठे बागायतदार शेतकरी कलिंगड पिकापासून दूर आहेत. लहान, मध्यम शेतकऱ्यांनी आपल्याकडील जलसाठ्याच्या उपलब्धतेनुसार कलिंगडाची लागवड केली आहे.

मजुरांची समस्या

कलिंगड लागवडीसंबंधीदेखील खानदेशात मजूरटंचाई जाणवत आहे. अनेक लहान शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने लागवड उरकून घेत आहेत. एक दिवसात एका कुटुंबातील तीन सदस्य पाऊण एकरात पाच बाय दीट फूट अंतरातील लागवड पूर्ण करून घेत आहेत.

कलिंगड लागवडदेखील किचकट, वेळखाऊ व अधिक श्रमाची प्रक्रिया आहे. यामुळे मजूर कलिंगड लागवडीसाठी येत नाहीत किंवा अधिकची मजुरी मागतात. यामुळे शेतकऱ्यांना कुटुंबीयांच्या मदतीने ही लागवड करून घ्यावी लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT