Watermelon Cultivation : पांढरकवडा तालुका झाला कलिंगडाचे ‘हब’

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याची ओळख; मात्र नजीकच्या काळात दिग्रस, पुसद तसेच उमरखेड तालुक्यात रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढीस लागली आहे.
Watermelon Cultivation
Watermelon CultivationAgrowon

यवतमाळ : आर्थिक स्वावलंबनाच्या मार्गाने वाटचाल करीत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक फेरपालटावर (Crop Pattern) भर दिला आहे.

यातूनच जिल्ह्याच्या पांढरकवडा तालुक्यात गेल्या काही वर्षांत कलिंगडाखालील लागवड (Watermelon Cultivation) क्षेत्र वाढीस लागले असून यंदा ते २०० एकरावर पोहोचण्याचा अंदाज आहे.

शेतकरी आत्महत्याग्रस्त (Farmer Suicide) यवतमाळ जिल्ह्याची ओळख; मात्र नजीकच्या काळात दिग्रस, पुसद तसेच उमरखेड तालुक्यात रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढीस लागली आहे.

यातूनच शेतकऱ्यांनी आर्थिक सक्षमता गाठण्यात यश मिळविले आहे. पीक फेरपालटाचा हाच पॅटर्न पांढरकवडा तालुक्यातील शेतकऱ्यांनीदेखील जपला असून ६५ ते ८० दिवस कालावधीचे पीक असलेल्या कलिंगडाने या शेतकऱ्यांच्या जीवनात गोडी भरली आहेत.

त्यामुळेच गेल्या काही वर्षांत पांढरकवडा तालुक्यात कलिंगडाखालील लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ नोंदवली गेली आहे.

सुरुवातीला ५०, त्यानंतर ७० पुढे १०० गेल्या वर्षीच्या हंगामात १७० तर यंदा हे क्षेत्र २०५ एकरपर्यंत पोहोचले आहे.

पिकाचा कालावधी कमी असून तापमान वाढल्यास ६५ ते ८० दिवसांत हे पीक परिपक्व होते. थंडी जास्त असल्यास परिपक्वता कालावधी वाढतो, अशी माहिती खैरगाव देशमुख येथील कलिंगड उत्पादक शेतकरी प्रकाश पुप्पलवार यांनी दिली.

थंडी अधिक असल्यास पीक परिपक्व होण्यास ९० दिवसांचा कालावधी लागतो.

Watermelon Cultivation
Watermelon Cultivation : कलिंगड लागवड करताना ही काळजी घ्या
कलिंगड पिकातून चांगला परतावा मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत पांढरकवडा तालुक्यात खैरगाव देशमुख व लगतच्या गावांमध्ये लागवड वाढीस लागली आहे. यंदा हे क्षेत्र २०० एकरपेक्षा अधिक आहे. नागपूर, कोलकाता येथे बाजारपेठ उपलब्ध होते. व्यापारी थेट खरेदी करतात.
प्रकाश पुप्पलवार, कलिंगड उत्पादक शेतकरी, खैरगाव देशमुख, यवतमाळ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com