Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Re-sowing Crisis : वरुणराजाची पाठ, दुबार पेरणीचे संकट

Kharif Season 2025 : अंबाजोगाई तालुक्यात मे व जुनच्या सुरवातीस झालेल्या पावसाच्या ओलिवर शेतकऱ्यांनी ६७ टक्के क्षेत्रावर पेरणी केली.

Team Agrowon

Beed News : अंबाजोगाई ः तालुक्यात मे व जुनच्या सुरवातीस झालेल्या पावसाच्या ओलिवर शेतकऱ्यांनी ६७ टक्के क्षेत्रावर पेरणी केली. मात्र मृग सुरू होताच पावसाने खंड दिला. त्यामुळेच अंकुरलेली पिके आता धोक्यात आहेत. म्हणजे अख्खे खरीप धोक्यात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

जमिनीत ओल चांगली होती, म्हणून शेतकऱ्यांनी (ता.१०) जूनपर्यंत पुढे पाऊस पडेल, या आशेवर पेरणी करून घेतली. या जुन महिन्यातच फक्त ४० मिलीमीटर पावसाची नोंद आहे. तिची पेरणीपूर्व हा पाऊस आहे. हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत जून महिन्यात झालेल्या १०६ मिलीमीटर पावसाच्या केवळ ३७ टक्के इतकेच आहे.

तालुक्यातील खरिपाचे मुख्य पिक हे सोयाबीन आहे. त्यामुळेच एकूण पेरणी योग्य क्षेत्राच्या ९० टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होतो. यंदा झालेल्या ६७ टक्के पेरणीमध्ये जवळपास ७० ते ८० टक्के सोयाबीनचा पेरा आहे. कडक उन व हवा सुटल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी थांबवली. मात्र तोपर्यंत ६० टक्यापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली होती.

तालुक्यात पेरणीनंतर १८ दिवस झाले पावसाचा खंड पडलेला आहे. जमिनीतील ओलाव्यावर पिके उगवली, चार पानावर आली. पण आता पावसाअभावी ही पिके धोक्यात असल्याचे चित्र आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे, त्यांनी ठिबक आणि तुषार संचाद्वारे पिकाला पाणी देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे यांच्या पिकांना आधार झाला. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांची पिके मात्र माना टाकू लागली आहेत. आता पावसाच्या हजेरीवरच या पिकांचे भवितव्य आहे.

केवळ सात टक्के पावसाची हजेरी

तालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६३२ मिलीमीटर आहे. मागील वर्षी एकूण ७८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. नोंदविले गेले होते. चालू वर्षातील जुनपर्यंत फक्त ४० मिलीमिटर पावसाची नोंद आहे.

एवढ्याच पावसावर ६७ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. म्हणजे ७९ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी ५२ हजार ९५८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. काही भागांमध्ये लवकर पेरणी करण्यात आलेली असून, विशेषतः डोंगराळ व हलक्या जमिनींमध्ये निचऱ्यामुळे पिकांवर ताण निर्माण झाला आहे.

येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये समाधानकारक पर्जन्यमान प्राप्त न झाल्यास अंदाजे २५ ते ३० टक्के क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झाली नाही त्यांनी चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणीची गडबड करू नये, ज्यांची पेरणी झाली आहे व पावसाच्या खंडामुळे पिके तानावर आहेत त्यांनी पोटॅशियुक्त खताचा वापर तसेच दोन टक्के युरिया वापर करावा. ज्या शेतकऱ्याकडे संरक्षित सिंचन उपलब्ध आहे त्यांनी संरक्षित सिंचनाचा वापर करावा.
— आर. व्ही. मुंडे, तालुका कृषी अधिकारी, अंबाजोगाई.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Market Road Issues: विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटच्या सुविधांवर पाणी

Fake Fertilizer: बोगस खतविक्रीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

Vanashree Award: भोकणीला वन विभागाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी धुळ्यातून २१५ विशेष बस

Agrowon Podcast: हरभरा दरात चढ-उतार ,ज्वारीच्या आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार, शेपू दरात स्थिरतातर केळीच्या आवकेत घट

SCROLL FOR NEXT