Re-Sowing Crisis
Re-Sowing CrisisAgrowon

Re-Sowing Crisis : जळगाव जिल्ह्यातील काही भागांत दुबार पेरणीचे संकट

Kharif Sowing : रावेर, यावल, जळगाव, जामनेर, बोदवड भागात समस्या गंभीर बनू शकते. अनेकांनी मागील आठ ते १० दिवसांपूर्वी मका, उडीद, मूग, ज्वारी आदी कोरडवाहू पिकांची पेरणी केली.
Published on

Jalgaon News : चांगला पाऊस नसल्याने जिल्ह्यातील जळगाव, यावल, रावेर, जामनेर भागात दुबार पेरणीचे संकट आहे. मागील आठ ते १० दिवसांत जिल्ह्यात कुठेही चांगला पाऊस झालेला नसल्याने पेरणी संकटात आहे.

रावेर, यावल, जळगाव, जामनेर, बोदवड भागात समस्या गंभीर बनू शकते. अनेकांनी मागील आठ ते १० दिवसांपूर्वी मका, उडीद, मूग, ज्वारी आदी कोरडवाहू पिकांची पेरणी केली. पण त्यावर पाऊस नाही. यामुळे पेरणी वाया जाण्याची भीती आहे. रावेर, यावल, जळगाव, जामनेर, बोदवड भागांत कोरडवाहू पिकांची पेरणी २० ते २५ टक्के झाली आहे.

त्यात मका लागवड अधिक आहे. तसेच उडीद, मूग व सोयाबीनची पेरणीदेखील झाली आहे. ११ जूननंतर जिल्ह्यात पाऊस आला. पण त्याबरोबर वादळही झाले. शेतकऱ्यांनी शेतांत मशागत केली.

Re-Sowing Crisis
Kolhapur Kharif Sowing : कोल्हापुरात ५३ हजार हेक्टरवर पेरा

उडीद, मूग, सोयाबीनची पेरणी लवकर व्हावी यासाठी पेरणीस प्रारंभ केला. परंतु त्यावर चांगला पाऊस झालेला नाही. रोज आकाशात ढगांची जमवाजमव होते. परंतु पाऊस कोसळत नाही. काही भागांत हलका पाऊस झाला. पण पेरणीवर चांगला पाऊस अपेक्षित आहे.

Re-Sowing Crisis
Kharif Sowing : पावसाच्या विश्रांतीमुळे पेरण्या रखडल्या

मध्येच दुपारी ऊन असते. सुसाट वारा सुटतो. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कारण मका, सोयाबीन, उडदाचे बियाणे महाग आहे व त्याची टंचाई आहे. पुढे दुबार पेरणीला हवे ते आणि हवे तेवढे बियाणे मिळणार नाही, अशी स्थिती आहे.

यात रोज ऊन व वारा अशी स्थिती असल्याने दुबार पेरणी करावी लागेल, अशी स्थिती आहे. हलक्या व मध्यम जमिनीत स्थिती बिकट बनत आहे. पाऊस नसल्याने आता पेरण्या थांबल्या आहेत.

मका, सोयाबीनला चांगला पाऊस हवा असतो. परंतु मागील आठ ते १० दिवसांत अनेक भागांत २५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेला नसल्याची स्थिती आहे. याचा परिणाम पेरणीवर झाल्याची माहिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com