Kharif Crops Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crops : पावसाअभावी जुन्नर आणि आंबेगावमध्ये पिके संकटात

Kharif Season : पुणे जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली असून हे दिवस कोरडे गेले आहेत. आता उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून पिकेही माना टाकू लागली आहेत

Team Agrowon

Pune News : जुन्नर, आंबेगाव तालुक्यांच्या पूर्व भागातील वाढीच्या अवस्थेतील पिके पावसाअभावी पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे.

अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून, विहिरींनी पाण्याचा तळ गाठला आहे. जिरायती आणि बागायती भागांतील शेतकऱ्यांनी उसनवारी करून खरिपाची पेरणी केली आहे; मात्र पदरी नुकसान आल्यामुळे आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

खरीप हंगामात जुन्नरमध्ये सरासरीच्या २९ हजार ७७७ हेक्टरपैकी २६ हजार ४७० हेक्टर म्हणजेच ८८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. आंबेगावमध्ये सरासरीच्या १६ हजार १४ हेक्टरपैकी १४ हजार ६१५ हेक्टर म्हणजेच ९१ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

मात्र जून महिन्यात जुन्नरमध्ये ७६.५ मिलिमीटर, तर जुलैमध्ये ५३.३ मिलिमीटर, आंबेगावमध्ये जूनमध्ये १२७.६ मिलिमीटर, जुलैमध्ये ७१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पूर्व भागात तुरळक सरी पडल्याने काही प्रमाणात पेरण्या झाल्या. परंतु आता पावसाअभावी सर्वच सर्वच पिके संकटात आली आहे.

सोयाबीनचे पीकदेखील संकटात आले असून, पूर्व भागात जनावरांच्या खाद्याचा प्रश्‍नदेखील आता भेडसावू लागला आहे. शेतकऱ्यांनी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली असून, पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. जो काही दोन महिन्यांत तालुक्यात पाऊस पडला तो प्रामुख्याने पश्‍चिम पट्ट्यात पडला आहे.

खरिपात मका, बाजरी, फळबाग, सोयाबीन अशी पिके अडचणीत आली आहेत.यंदा कमी पाऊस पडल्याने यंदा शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा या पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

कृषी विभागाने तत्परता दाखवत गावस्तरीय कार्यशाळांचे आयोजन करून पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आमच्या भागात विहिरींना थोडे पाणी असल्याने अनेक शेतकरी रोज एक ते दीड तास पिकांना ठिबकने पाणी देत आहेत. येत्या आगामी काळात पाऊस न पडल्यास पाणीटंचाई सुरू होईल आणि कदाचित टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
- जितेंद्र बिडवाई, अध्यक्ष, द्राक्ष उत्पादक संघ, जुन्नर
माझ्याकडे एकूण पाच शेती आहे. त्यामध्ये खरिपात सोयाबीन, कोथिंबीर, ऊस अशी पिके आहेत. दोन महिने झाले तरी पाऊस पडलेला नाही. त्यामुळे सोयाबीन, ऊस पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. विहिरींनी तळ गाठला असल्याने सोयाबीन पीक सुकत आहे.
- नितीन ढोबळे, शेतकरी, जारकरवाडी, ता. आंबेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT