Agricultural Growth: भारताने तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकत जगात आघाडी घेतली असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्पष्ट केले आहे. चीनच्या १४५.५८ दशलक्ष टनाच्या तुलनेत भारताचे तांदूळ उत्पादन १५०.१८ दशलक्ष टन झाले आहे. कोरोना आपत्ती आणि त्यानंतरचे रशिया - युक्रेन तसेच इस्राईल - पॅलेस्टाईन युद्ध आणि मागील वर्षभरापासून सुरू असलेले व्यापार युद्ध यामुळे चीनचा सर्व भर हा अन्नधान्य आत्मनिर्भरतेवर राहीला आहे. .अशा वेळी भारताने तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून फारच उल्लेखनीय काम केले आहे. या देशातील शेतकरी, शास्त्रज्ञ तसेच शासन यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे साध्य झाले आहे. तांदूळ उत्पादनात आघाडी घेतल्यानंतर आता निर्यातीतही आघाडी घेऊन आपला तांदूळ जगभर पोहोचण्यासाठी देखील प्रयत्न वाढवावे लागणार आहेत. असे झाले तरच अधिक तांदूळ उत्पादनाचे लाभ उत्पादकांपर्यंत पोहोचतील..Crops New Variety: पंचवीस पिकांचे १८४ नवीन वाण प्रसारित.अलीकडेच भारताने २५ पिकांचे हवामान सहनशील तसेच अधिक उत्पादनक्षम तब्बल १८४ नवीन वाणं प्रसारित केली आहेत. ‘आयसीएआर’बरोबर कृषी विद्यापीठे, केंद्र - राज्य कृषी संशोधन संस्था आणि खासगी कंपन्या यांचा नवे वाण विकसित करण्यामध्ये मोलाचा वाटा राहिला आहे. देशभरातील शेतकऱ्यांना हवामान बदलाचा फटका बसत असताना ही नवी वाणं त्यांना उपयुक्त ठरतील. नवी वाणं जैविक - अजैविक ताण सहनशील, क्षारपड मातीत उत्तम येणारी, दुष्काळ - अतिवृष्टीत तग धरणारी तसेच सेंद्रीय आणि नैसर्गिक शेतीसह पूरक असल्याने त्याचा शेतकऱ्यांना लाभच होणार आहे..असे असले तरी नवी वाण प्रसारित केल्यानंतर त्यांचे बीजोत्पादन करून ती लवकरात लवकर सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे मोठे आव्हानात्मक काम आहे. त्याकरिता या नव्या वाणांचा प्रसार - प्रचार करून त्यांची गुणवैशिष्ट्ये शेतकऱ्यांना सांगावी लागतील. हे करीत असताना विभागनिहाय व्यापक बीजोत्पादन कार्यक्रम राबवावे लागणार आहेत. असे झाले तरच नवी वाणं शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचून त्याचे प्रत्यक्ष लाभ त्यांना होतील..Rice Variety: ‘ट्रॉम्बे कोकण महान’ भाताची जात प्रसारित.नवे वाण संशोधनात समतोलाचा अभाव दिसतो. १८४ नव्या वाणांमध्ये तब्बल १२२ तृणधान्ये, १३ तेलबिया आणि केवळ सहा कडधान्यांचा समावेश आहे. तर चारा पिकांचे ११ वाण, उसाचे सहा आणि कापसाचे २२ नवे वाण प्रसारित करण्यात आले आहेत. खरे तर आपण अन्नधान्यांमध्ये फक्त तृणधान्यांत स्वयंपूर्ण आहोत. तर जवळपास ६० ते ६५ टक्के खाद्यतेल आणि ३० ते ३५ टक्के डाळी दरवर्षी आपल्याला आयात कराव्या लागतात. यावर देशाचे मोठे परकीय चलन खर्च होते. अशा वेळी नव्या वाण संशोधनाचा भर हा तेलबिया तसेच कडधान्यांवर हवा..तृणधान्यांबरोबर कडधान्य आणि तेलबिया यांचा भारत हा पारंपरिक उत्पादक देश आहे. कडधान्य, तेलबिया उत्पादन, वापर तसेच आयातीतही आपली आघाडी आहे. त्यामुळे कडधान्य तसेच खाद्यतेलात स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाणं संशोधनावर आपला भर असायला हवा. नव्या वाण संशोधनाबरोबर हवामान बदलाशी अनुरूप पीक पद्धतीत बदल, जमीन व्यवस्थापन, जलसंधारण, संरक्षित शेती, पीक संरक्षण, आंतरपीक - मिश्रपीक पद्धती आदींचा अवलंब देखील करावा लागणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.