Modern Agriculture: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत सिंदेवाही (चंद्रपूर) येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या माध्यमातून धान (भात) पट्ट्यात यांत्रिकीकरणाबरोबर पेरीव धान पद्धतीला प्रोत्साहन दिले जात आहे. या अनुषंगाने झालेल्या प्रयोगांना शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद लाभला असून, मागील काही वर्षांत २० टक्के क्षेत्रावर या पद्धतीने लागवड होत आहे.