Radhakrushna Vikhe Patil : दुबार पेरणीचं संकट; राज्य सरकारचं परिस्थितीवर लक्ष

पुणे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सरकार गंभीर आहे, असंही विखे पाटील म्हणाले.
Radhakrushna Vikhe Patil
Radhakrushna Vikhe PatilAgrowon

राज्यात दुबार पेरणीचं संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांसाठी काय करता येईल, याबद्दल सरकार विचार करत आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ते राळेगणसिद्धी येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी दूधाचे दर आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेळी मेंढी प्रकल्पाबद्दल माहिती दिली.

विखे पाटील म्हणाले, "राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. परंतु अजूनही सर्वच जिल्ह्यात चांगला पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, याबाबत सरकार विचार करत आहे."

पुणे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सरकार गंभीर आहे, असंही विखे पाटील म्हणाले.

दूध दरातील पळवाट

राज्यात खासगी दूध संघाकडून दरातील पळवाटा शोधण्याचा डाव खेळला जात असल्याची परिस्थिती आहे. राज्य सरकारनं निश्चित केलेल्या ३४ रुपये लीटरचा भाव देताना दूध संघ कुचराई करतायत. यावर विखे म्हणाले, "एसएनएफचा मुद्दा पुढे करून खासगी संस्था शेतकऱ्यांचे पैसे कमी करत आहेत, मात्र हे चुकीचं आहे. अशा संस्थांवर कारवाईचे आदेश मी सचिवांना दिले आहेत." दूध उत्पादक शेतकऱ्याला ३४ रुपये दर मिळावा अशी आमची भूमिका असल्याचं स्पष्ट केलं.

शेळी मेंढी संशोधन केंद्र

शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकरी मेंढी आणि शेळीपालन करतात. राज्यातील नियोजित अहमदनगर जिल्ह्यातील ढवळपुरी येथील शेळी मेंढी संशोधन केंद्र इतर ठिकाणी हलवणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु यावर विखे म्हणाले, ढवळपुरी येथील शेळी मेंढी संशोधन केंद्र कुठेही हलवाणार नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com