Pune Rain Update : पुणे दोन महिन्यांत जिल्ह्यात सरासरी ७६ टक्के पाऊस

Pune Rain : पावसाचे जवळपास दोन महिने ओलांडले आहेत. या काळात कमी-अधिक पाऊस पडला आहे.
Rain
RainAgrowon

Pune News : पावसाचे जवळपास दोन महिने ओलांडले आहेत. या काळात कमी-अधिक पाऊस पडला आहे. जून आणि जुलै या दोन महिन्यांत दर वर्षी सरासरी ४८५.५ मिलिमीटर पाऊस पडतो. त्यापैकी आतापर्यंत ३७२.३ मिलिमीटर म्हणजेच ७६ टक्के पाऊस पडला असला, तरी सरासरीच्या तुलनेत २४ टक्क्यांनी त्यात घट झाली असल्याचे स्थिती आहे.

पश्‍चिमेकडील चासकमान, कळमोडी, खडकवासला अशी धरणे भरली असून, काही धरणांतील पाणीसाठा ५० टक्क्यांहून अधिक झाला आहे.

पुणे जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांची पावसाची सरासरी ८६१.६ मिलिमीटर एवढी आहे. गेल्या वर्षी याच काळात जिल्ह्यांत ५१९.२ मिलिमीटर पाऊस पडला होता. सरासरी १०५ मिलिमीटर पाऊस पडला होता.

Rain
Pune Rain Update : पावसाचा जोर ओसरल्याने धरणातील आवक घटली

त्या तुलनेत चालू वर्षी पावसामध्ये काहीशी घट झाली आहे. गेल्या जून महिन्यात महिन्यातही सरासरी ४९२.३ मिलिमीटरपैकी ३७२.३ मिलिमीटर म्हणजेच ७५ टक्के पाऊस पडला होता. यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा २४ टक्के कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्याची स्थिती आहे. तसेच काही धरणांतील पाणीसाठा फारसा वाढलेला नाही. येत्या काळात पुरेसा पाऊस न झाल्यास आगामी काळात पाण्याची मोठी टंचाई भासण्याची शक्यता आहे.

Rain
Maharashtra Rain Update : जुलैमध्ये पावसाची दमदार हजेरी

जिल्ह्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर २४ जून ते १ जुलै या कालावधीत जोरदार पाऊस पडला. पश्‍चिम पट्ट्यातील सर्वच धरणक्षेत्रांत कमी-अधिक पाऊस पडला. मुळशी ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा, कुंडली या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळला.

त्यानंतर पावसाने काहीशी उघडीप देत घाटमाथ्यावर पावसाची अधूनमधून संततधार सुरूच होती. परंतु १८ जुलैनंतर पुन्हा पावसास पोषक वातावरण बनले. तेव्हापासून ते जवळपास ३१ जुलैपर्यंत पश्‍चिम पट्ट्यात चांगलाच जोरदार पाऊस बरसला. पूर्व भागात पावसाचा जोर कमी आहे. बारामती तालुक्याच्या पश्‍चिम भागात अजूनही जोरदार पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगाम वाया गेल्याचे चित्र आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com