Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : कंदर भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, पपई भुईसपाट

Unseasonal Rain : उजनी धरण परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने उजनी जलाशयाच्या काठावरील कंदर, फुटजवळगाव परिसरातील केळी, ऊस, पपई आदी पिके जमीनदोस्त झाली आहेत.

सुदर्शन सुतार

Solapur News : उजनी धरण परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने उजनी जलाशयाच्या काठावरील कंदर, फुटजवळगाव परिसरातील केळी, ऊस, पपई आदी पिके जमीनदोस्त झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांची काढणीला आलेली पिके भुईसपाट झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

उजनी धरणामुळे जलाशयाचा काठ सुजलाम्, सुफलाम् झालेला आहे. या भागात ऊस, केळी, फळबागा व भाजीपाल्याची पिकांची लागवड झाली आहे. परंतु ता. १४ रोजी उजनी धरण परिसरातील माढा तालुक्यातील फुटजवळगाव व करमाळा तालुक्यातील कंदर आदी भागाला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने तडाखा दिला.

या वादळी वाऱ्यामुळे उजनी जलाशयाच्या काठावरील केळी, ऊस, पपई ही पिके भुईसपाट झाली. तसेच आंबा फळबागेला फटका बसला. या वादळी वाऱ्यामुळे अकोलेखुर्द येथील शेतकरी विरुपाक्ष ऊर्फ राजाभाऊ तोडकर यांच्या कंदर हद्दीतील तीन एकर केळी पिकाचे नुकसान झाले.

तसेच अनिल तोडकर, गजानन तोडकर यांची चार एकर केळी, रामभाऊ तोडकर, बिभीषण तोडकर, दादासाहेब जगताप, फुटजवळगाव येथील वामनराव नवले, बापू पवार, दादा नवले, विठ्ठल नवले, समाधान पाटील, समाधान नवले, कदम, लांडगे, अकोले-खुर्द येथील संपत पाटील, बाळू पाटील, सुनील नवले,

नागा डाकवले, बाबा निकम, बाबा शिंदे, म्हांकाळ शिंदे, चंद्रकांत तोडकर, नवनाथ मासाळ, नागेश पाटील, बबन राऊत, गणेश राऊत आदींची ऊस, केळी ही पिके वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता मदतीशिवाय या शेतकऱ्यांसमोर पर्याय नाही.

शेतकऱ्यांनी अशा संकटांत कसे उभे राहायचे? किती वेळा नुकसान सहन करायचे आणि बँका व खासगी सावकारांचे कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्‍न आम्हा शेतकऱ्यांसमोर आहे. माढा व करमाळ्याच्या तहसीलदारांना नुकसानी संदर्भात कळवले आहे.
- राजाभाऊ तोडकर, शेतकरी, अकोलेखुर्द
फुटजवळगाव (ता. माढा) येथे तीन एकर काढणी योग्य केळी असून, वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाली. यामुळे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तहसीलदारांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.
- वामनराव देवराव नवले, शेतकरी, फुटजवळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

SCROLL FOR NEXT