Crop Damage : मराठवाड्यात नऊ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Pre-Monsoon Rain : मराठवाड्यात ९ एप्रिल ते १५ मे दरम्यान ३६ दिवसांत झालेल्या वादळी पूर्वमोसमी पावसाने ९७६ गावांतील १७ हजार ६८७ शेतकऱ्यांच्या जवळपास ९ हजार २१० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे.
Banana Crop Damage
Banana Crop DamageAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात ९ एप्रिल ते १५ मे दरम्यान ३६ दिवसांत झालेल्या वादळी पूर्वमोसमी पावसाने ९७६ गावांतील १७ हजार ६८७ शेतकऱ्यांच्या जवळपास ९ हजार २१० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. आधीच्या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत तोच दुसरा दणका असच काहीस चित्र मराठवाड्यात पाहायला मिळते आहे.

एकीकडे निवडणूक प्रचाराचा जोर आणि दुसरीकडे वादळी पावसाचा दणका मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळाला. निवडणुकीमुळे संपूर्ण यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिल्याने नुकसानीचे पंचनामे वेळेत होणार नाही आणि मदतीची मागणी ही तातडीने होणार नाही हे स्पष्टच होते. माहितीनुसार ९ एप्रिल ते १५ मे दरम्यान मराठवाड्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस व काही ठिकाणी गारपीटही झाली.

Banana Crop Damage
Crop Damage : पूर्वमोसमीचा तीळ पिकाला तडाखा

सूत्रांच्या माहितीनुसार मराठवाड्यात या वादळी पावसाच्या कालावधीत वीज पाडून ४२ जण जखमी तर २५ जणांचा मृत्यू झाला. लहान, मोठे, ओढकाम करणारे व दुधाळ असे एकूण ३४५ पशूधन दगावले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २३७ हेक्टर, जालना १२९८.३, परभणी ४४३.२१, हिंगोली ८७५.४, नांदेड १०८८.५६, बीड २३२०.८६, लातूर १०७५.१४, धाराशिव जिल्ह्यात १८७१.६६ हेक्टर बागायती, जिरायती व फळपिकांचे नुकसान झाले.

Banana Crop Damage
Crop Damage : शेतकऱ्यांवर ‘अवकळा’

या पावसाचा मराठवाड्यातील ९७६ गावांतील १७ हजार ६८७ शेतकऱ्यांना फटका बसला. जवळपास ९ हजार २१० हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. मराठवाड्यातील ७४७ पक्क्या व कच्च्या घरांची पडझड झाली आहे. एप्रिल महिन्याचे पंचमाने पूर्ण झाले असून ते जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे येतील आणि त्यानंतर सर्वांची गोळाबेरीजच करून नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे केली जाईल.

९ एप्रिल ते १५ मेपर्यंत झालेले नुकसान

जिल्हा...बाधित गावे...बाधित शेतकरी संख्या

छत्रपती संभाजीनगर...१२...४४०

जालना...१६६...२३२१

परभणी...५५...७८४

हिंगोली...२४...२९४४

नांदेड...४७...१४९६

बीड...१६८...४८६६

लातूर...२२०...१९४३

धाराशिव...२८४...२८९३

एकूण...९७६...१७ हजार ६८७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com