Igatpuri News: भाताचे प्रमुख आगार असलेल्या इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यातून सावरत शेतकऱ्यांनी जोरात सोंगणीला सुरवात केली असून, बहुतांश क्षेत्रात भात सोंगणी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र परतीच्या पावसाने आधीच पिकांचे मोठे नुकसान केले. त्यात भातपिकात वाढलेल्या कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात लक्षणीय घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे..शेतकरी सांगतात की, अवाजवी खर्च आणि घसरलेले उत्पन्न यामुळे सोंगणीही तोट्याची ठरत आहे. वाढलेल्या आवणीपासून ते सोंगणीपर्यंतचा खर्च दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वेळोवेळी मागणी करूनही शासनाचे लक्ष शेतकऱ्यांकडे नसल्याची भावना व्यक्त होत आहे. तालुक्यात कृषी खात्याच्या दोन यंत्रणा असतानाही मार्गदर्शनाचा अभाव कायम आहे..Paddy Harvesting: भात कापणीसाठी यांत्रिकीकरणाकडे कल.कुठल्या पिकाची कशी काळजी घ्यावी, फवारणी कशी करावी, अधिक पावसाने निर्माण संकटाला कसे सामोरे जावे याचे मार्गदर्शन मिळत नाही, अशी शेतकऱ्यांची खंत आहे. गतवर्षीची मदत अजूनही प्रलंबित असून, संकटाच्या वेळी एकमेकांकडे बोट दाखविण्याची शासकीय पद्धत कायम असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत..लागवड कमी, उत्पादनात घटनिसर्गातील अनिश्चितता, जमिनीची घटती सुपीकता यामुळे नागली, वरई, खुरसणी यांसारख्या पिकांची लागवड पूर्वीच्या तुलनेत कोसळली आहे. या वर्षी तालुक्याचे २८ हजार ९०० हेक्टर पेरणी क्षेत्र नोंदले गेले. हेच क्षेत्र ८-१० वर्षांपूर्वी ३० हजार हेक्टर होते. यंदा पीक विमा क्षेत्रफळ केवळ ३० ते ४० टक्के असून, शेतकरी विम्याबाबतही उदासीन आहेत..Paddy Harvest: थंडीच्या लाटेत शेतकरी कामात गर्क.शेतीतील खर्चाचा ताळेबंद शेतकऱ्यांना तोट्यात ढकलणारा आहे. भाताचे एकरी सरासरी उत्पादन १० क्विंटल असून हळीव वाणांना बाजारात कमी भाव मिळतो. प्रतिक्विंटल २ ते २.५ हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या हाती केवळ २० हजार रुपये येतात. त्यामुळे उत्पादन आणि उत्पन्नात तफावतच वाढत चालली आहे..इगतपुरीचे प्रमुख पीक असलेले भात यंदा पावसाने व रोगराईने उद्ध्वस्त झाले. मजुरीचे दर दुप्पट झाल्याने शेती करणे जिकिरीचे झाले आहे.- विठोबा झुगरे, शेतकरी, वाळविहीर.पावसाने सुरवातीला साथ दिली; पण त्याचे वेळापत्रक बिघडल्याने कडा, करपा, तुडतुड्या अशा रोगांनी भाताचे प्रचंड नुकसान केले. हंगामाचा खर्चही प्रचंड वाढला.- सुरेश बोडके, शेतकरी, त्रिंगलवाडी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.