Crop Advisroy Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory : कृषी सल्ला

Agriculture Advisory : सततच्या ढगाळ हवामानामुळे राहुरी विभागातील कृषी सल्ल्याबाबतची माहिती या लेखात पाहुयात.

Team Agrowon

Agriculture Crop Advisory :

गहू

फुटवे फुटण्याची अवस्था.

सततच्या ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्याकरिता हवामान कोरडे असताना थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यूजी) ०.१ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

हरभरा

पिकास फांद्या फुटताना.

मध्यंतरीच्या सतत ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

हेलिकोव्हर्पा अळीच्या प्रतिबंधासाठी, कडुनिंबाचे तेल* ३ ते ३.५ मिलि किंवा बिव्हेरिया बॅसियाना ३ ते ३.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. (*ॲग्रेस्को शिफारस.)

अळीचा प्रादुर्भाव दिसत असल्यास, हवामान कोरडे असताना ॲझाडिरॅक्टिन (१००० पीपीएम) २ ते ३ मि.लि. किंवा हेलिओकील (विषाणूग्रस्त अळीचा अर्क) १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे हेक्टरी ५०० लिटर द्रावणाची फवारणी करावी.

जर अळी मोठी असल्यास इमामेक्टीन बेझोएट (५ टक्के) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

फवारणीनंतर सूक्ष्म अन्नद्रव्ये ‘ग्रेड- २’ची फवारणी करावी (प्रमाण ः १० मिलि/ लिटर पाणी)

रब्बी ज्वारी

ओंबी तयार होण्याची अवस्था

तापमान १५ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास मावा किडीचे व मावा किडीच्या शरीरातून स्रवणाऱ्या चिकट रसावर वाढणाऱ्या बुरशीमुळे चिकटा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) ५ मिलि प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.

तूर

तुरीच्या शेंगा वाळल्यानंतर पीक कापून घ्यावे व खळ्यावर मळणी करावी. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये, कारण वांझ रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.

मका

लष्करी अळी (फॉल आर्मीवॉर्म) नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी

इंडोक्साकार्ब (१५.८ ईसी) १ मिलि किंवा इमामेक्टिन बेंझोएट (५ एसजी) ०.३ ग्रॅम.

मिरची

मिरचीवरील लिफकर्ल (चुरडा-मुरडा) या विषाणूजन्य रोगाचा प्रसार फुलकिडे, पांढरी माशी आणि कोळी या रसशोषक किडीमार्फत होतो. या किडीच्या नियंत्रणासाठी.

सुरुवातीला लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ०.६ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील १.५ मिलि आणि कोळीच्या नियंत्रणाकरिता फेनाझाक्विन २ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

लिंबू वर्गीय पिके

मावा, सिट्रस सिला आणि पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास,

थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.१ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

कांदा

कांदा पिकावर सध्याच्या वातावरणामुळे फुलकिडींचा व करपा रोगाचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव दिसताच फवारणी प्रति लिटर पाणी

लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ०.६ मिलि अधिक टेब्युकोनॅझोल १ मिलि अधिक स्टिकर १ मिलि.

लसूण

पिकावर फुलकिडे आणि पांढरे लांबट कोळी या किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसून येताच,

फिप्रोनील (५ एससी) १.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. सध्या उष्णता वाढू लागल्यामुळे लसणावर कोळी किडीचा प्रार्दुभाव वाढू शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी फेनपायरॉक्झिमेट (५ ईसी) १.८० मिलि किंवा फेनाक्झाक्विन (१० ईसी) २.५ मिलि प्रति लिटर या प्रमाणे एका कोळीनाशकाची नॅपसॅक पंपाद्वारे फवारणी करावी.

टोमॅटो

सध्याच्या वातावरणामुळे लवकर येणारा करपा (पानावर आणि फळांवर) तसेच विविध बुरशीच्या प्रादुर्भावाने टोमॅटो फळावर येणाऱ्या ठिपक्यांचे प्रमाण वाढू शकते. त्यासाठी झाडावरील तसेच जमिनीवर पडलेली रोगग्रस्त पाने, फळे गोळा करून व्यवस्थित जाळून नष्ट करावीत. ती बांधावर अथवा टोमॅटो प्लॉटशेजारी टाकू नये.

फळसड आणि उशीरा येणाऱ्या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा

टेब्युकोनॅझोल १ मिलि किंवा मेटॅलॅक्झिल अधिक कॉपर ऑक्झिक्लोराइड (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम.

साध्या हातपंपाने गरजेनुसार १०-१५ दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून फवारणी करावी.

फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, सायपरमेथ्रीन (१० इसी) १ मिलि किंवा इमामेक्टीन बेंझोएट (५ डब्ल्यूजी) ०.४ ग्रॅम किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि किंवा फ्लुबेंडायअमाइड (३९.३५ एससी) ०.३ मिलि.या फवारणी दरम्यानच्या काळात निंबोळी अर्काची (५ टक्के) अधून-मधून फवारणी करावी.

: ०२४२६- २४३२३९

(प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT