Rabi Crops Infestation : कोल्हापूर जिल्ह्यात रब्बी पिकांवर किडीचा प्रार्दुभाव, असे करा नियोजन

Rabi Crop : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पिकांना आता किडीच्या प्रार्दुभावाला सामोरे जावे लागत आहे.
Rabi Crops Infestation
Rabi Crops Infestationagrowon

Kolhapur Rabi Crop : सध्या रब्बीचा हंगाम सुरू झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारी, गहू, हरभऱ्याचे मोठे उत्पादन घेतले जात आहे. दरम्यान रब्बी हंगामाच्या सुरूवातीला पाऊस झाला नसल्याने पिकांनी म्हणावा तसा जोर धरला नाही. अशातच आता जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पिकांना आता किडीच्या प्रार्दुभावाला सामोरे जावे लागत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात हंगामी पीक म्हणून शिरोळ, हातकणंगले, करवीर, या तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरभऱ्याचे पीक घेतात. परंतु यंदा हरभऱ्याचे पीक जोमदार असताना कटवर्म व स्पोडोप्टेरा या अळींचा प्रादुर्भाव झाल्याने पिके धोक्यात आली आहेत. पिकांना बहार येत असतानाच पाने पिवळी पडत आहेत. तर सततच्या ढगाळ वातावरणामुळे या अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या रब्बी पेरणीत हरभरा, गहू, खपली, शाळू मोठ्या प्रमाणात केला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हरभऱ्यावर कटवर्म व स्पोडोप्टेरा रोगाची लक्षणे आढळून येत आहेत. या दोन्ही कीड बहुभक्षी असून उशिरा पेरणी केलेल्या पिकावर या किडीचा प्रादुर्भाव होत आहे.

सुरुवातीला मादी पतंग पीक व गवताच्या पानांवर व कोवळ्या शेंडयांवर समूहाने ३०० ते ४०० अंडी घालते. या अळीची लांबी ०.२ ते १.५ इंच असते. पूर्ण वाढ झालेली अळी १.५ ते २ इंच लांब असते. पावसाअभावी पिकांना पाण्याची कमतरता भासत असल्याने किडीचा प्रार्दुभाव जास्त होत आहे.

Rabi Crops Infestation
Shetkari Sangh Kolhapur : कोल्हापूर शेतकरी संघात ७२ लाखांचा घोटाळा, व्यवस्थापकावर गुन्हा

कशी ओळखाल कीड

रंग भुरकट हिरवा, काळपट किंवा करडा असतो. अळीच्या शरीरावर दोन्ही बाजूंनी करड्या रंगाचा पट्टा असतो. ही अळी झाडाच्या बुंध्याला मातीमध्ये लपलेली असते. मुख्यत्वे रात्रीच्या वेळी पिकांवर हल्ला चढवून पाने खाते. प्रादुर्भाव जास्त असल्यास ती दिवसाही आढळते.

असे होईल व्यवस्थापन

निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरेक्टिन ३०० पीपीएम ५० मि.लि. किंवा अझाडिरेक्टिन १५०० पीपीएम २५ मि.लि. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, दोन अळ्या प्रतिमीटर ओळ असे आर्थिक नुकसान आढल्यास क्लोरोफायरीफास २० टक्के ईसी ५० मि.लि. किवा क्लोरेंटनिप्रोल १८.५ टक्के ३.० मि.लि. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com