Pune News: समाधानकारक पावसामुळे रब्बी पेरणीने यंदा आघाडी घेतली आहे. देशात आतापर्यंत जवळपास ७६ लाख हेक्टरवर पेरा झाला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी आघाडीवर आहे. पेरणीत गहू, हरभरा आणि मोहरीसह तेलबिया पिकांनी आघाडी घेतली आहे. .रब्बीतील महत्वाचे पीक असलेल्या गव्हाची पेरणी ३१ ऑक्टोबरपर्यंत ३ लाख ३० हजार हेक्टरवर झाली. मागीलवर्षी यात काळातील पेरणी २ लाख ३० हजार हेक्टर होती. म्हणझेच पेरा १ लाख हेक्टरने जास्त आहे. सरकारने यंदा गहू उत्पादनाचे उद्दीष्ट ११९ दशलक्ष टन ठेवले आहे..Rabi Crop Sowing: लोहा तालुक्यात रब्बी पेरणीत वाढीचा अंदाज .रब्बीत कडधान्याची पेरणीही आघाडीवर आहे. एकूण कडधान्याची पेरणी २६ टक्क्यांनी वाढून जवळपास २१ लाख हेक्टरवर पोचली. रब्बीतील महत्वाच्या कडधान्य असलेल्या हरभऱ्याची पेरणी आतापर्यंत जवळपास १५ टक्क्यांनी आघाडीवर आहे. हरभऱ्याचा पेरा जवळपास १५ लाख हेक्टरवर झाला..मसूरचे क्षेत्रही गेल्यावर्षीच्या १९ लाख हेक्टरच्या तुलनेत २६ लाख हेक्टपर्यंत वाढलेले दिसते. रब्बी तेलबियांचे क्षेत्र ४२ लाख ३० हजार हेक्टरवर पोचले. यात मोहरीने ४१.७ लाख हेक्टर व्यापले. मागील वर्षी हे क्षेत्र ३७.४ लाख हेक्टर होते. एकूण तेलबिया पेरणी १३ टक्क्याने आघाडीवर आहे..Rabi Crop Sowing : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ३४ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी; अवकाळी पावसामुळे पेरणी रखडली.ज्वारी, मका आणि भाताची लागवड मात्र काहीशी पिछाडीवर दिसत आहे. ज्वारीचा पेरा २ लाख ७० हजार हेक्टरवर पोचला. तर मक्याची पेरणी २ लाख १० हजार हेक्टरवर झाली आहे. भाताची पेरणीही पिछाडीवर असून ३ लाख ७० हजार हेक्टरवर पोचली आहे..उत्पादनाचे उद्दीष्टकेंद्र सरकारने यंदा देशात ३६२ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवले आहे. यापैकी ४७ टक्के म्हणजेच १७१ दशलक्ष टन उत्पादनाचे उद्दीष्ट रब्बी हंगामात ठवले आहे. सरकारने यंदाच्या हंगामात ११९ दशलक्ष टन गहू उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवले आहे. भाताचे १५८ लाख टन, मक्याचे १४५ लाख टन, हरभऱ्याचे ११८ लाख टन, मसूरचे १९ लाख टन आणि मोहरीचे उत्पादन १३९ लाख टनांचे उद्दीष्ट आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.