डॉ. रवींद्र जाधव, डॉ. विवेक संगेकरबऱ्याच पशुपालकांना तोंडावाटे औषधे देण्याच्या पद्धतीबद्दल परिपूर्ण माहिती नसते. काही पशुपालक जनावरावर जबरदस्तीने औषधे पाजतात, तर काही पशुपालक नाकातून औषध पाजतात. औषधे पाजताना योग्य तंत्र न वापरल्यास जनावरास ठसका लागून औषधाची मात्रा फुप्फुसात जाते. यामुळे फुप्फुसदाह (ॲस्पिरेशन न्यूमोनिया) होतो. हे लक्षात घेऊन औषधे पाजताना योग्य काळजी घ्यावी..विविध आजारांच्या उपचारादरम्यान तसेच दुधाळ जनावरांना उत्पादकता आणि प्रजननाशी निगडित विविध आजार प्रतिबंधासाठी, जंत निर्मूलन आदीसाठी विविध औषधे तोंडावाटे द्यावी लागतात. बऱ्याच वेळा पशुपालकांकडून चुकीच्या पद्धतीने औषध पाजल्यामुळे किंवा जनावरांनी तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या औषधांना केलेला प्रतिकार यातून प्राणघातक ठसका लागून धोका उद्भवू शकतो..Winter Livestock Care: थंडीमध्ये जनावरांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? .शक्यतो पातळ औषधे पाजताना अपघात झाल्यास किंवा ठसका लागल्यास पाजण्यात येणारी औषधे श्वसनसंस्थेत जाऊन फुप्फुसाला इजा होते. औषध पाजताना श्वसनसंस्थेत गेलेले औषध जास्त मात्रेत असेल तर जनावर तात्काळ मृत्युमुखी पडण्याची शक्यता असते. बऱ्याच पशुपालकांना तोंडावाटे औषधे देण्याच्या पद्धतीबद्दल परिपूर्ण माहिती नसते, काही पशुपालक जनावरावर जबरदस्ती करून औषधे पाजतात, काही पशुपालक नाकातून औषध पाजतात. चुकीच्या पद्धतीने जनावरांना औषध जबरदस्तीने पाजल्याने ठसका लागून अपघात होतो..आजाराचा धोकाजनावरांना औषध किंवा द्रवपदार्थ जास्त प्रमाणात तोंडावाटे देण्याची पद्धत म्हणजे ड्रेचिंग (औषधे पाजणे). परंतु जनावरांना औषधे पाजताना योग्य तंत्र न वापरल्यास जनावरास ठसका लागून औषधाची मात्रा फुप्फुसात जाऊन त्यातून फुप्फुसदाह (ॲस्पिरेशन न्यूमोनिया) होतो.जनावरांना योग्य काळजी घेऊन औषधे न पाजल्यामुळे श्वसन नलिकेत औषध जाऊन ॲस्पिरेशन न्यूमोनियाचे होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते. बाधित जनावराची उत्पादकता घटून औषधोपचारावर खर्च वाढतो..Monsoon Livestock Care: पावसाळ्यात जनावरांचा आजारांचा धोका; कशी घ्यायची काळजी?.ठसका लागण्याची कारणेडोके उंच पकडणे किंवा जीभ ओढून धरल्यामुळे जनावरांना औषध गिळण्यास अडथळा येतो. यामुळे औषध फुप्फुसात जाण्याचा धोका वाढतो.जनावरांना गिळण्याच्या क्षमतेपेक्षा वेगाने व घाईघाईने औषध पाजल्यास ते श्वसननलिका आणि फुप्फुसात जाण्याची शक्यता असते..एकावेळी जास्त औषध देताना जनावर ते गिळू शकत नाही. परिणामस्वरूपी श्वसननलिकेत औषध जाते. उत्साहित किंवा धडपडणारे जनावर असल्यास अचानक खोकला किंवा हालचालींमुळे औषध चुकीच्या नलिकेत जाते.कमजोर, आजारी (दुग्धज्वर, तिवा, तोंडाचा अर्धांगवायू, घशाला सूज येणे) किंवा अशक्त जनावरे औषधी गिळण्याची प्रक्रिया व्यवस्थित करू शकत नाहीत. अशा जनावरांत औषधे पाजण्याची जबरदस्ती जर पशुपालकाने केली तर त्यातून औषधाची मात्रा फुप्फुसात जाण्याची शक्यता निर्माण होते. फेसाळ प्रकारची औषधे पाजताना ती सहज श्वसननलिकेत जाण्याची शक्यता राहते..Monsoon Livestock Care: घटसर्प, फऱ्या आणि लम्पी रोगांपासून जनावरांच्या रक्षणासाठी ३ सोपे उपाय!.औषध पोटात सोडण्यासाठी तोंडावाटे सोडण्यात येणारी ट्यूब (स्टमक ट्यूब) चुकून श्वसननलिकेत गेल्यास औषध श्वसनसंस्थेत जाऊन ॲस्पिरेशन न्यूमोनियाचे होण्याची शक्यता असते.औषध पाजण्याचा पशुपालकाला योग्य अनुभव नसल्यास जनावराला ठसका लागून विपरीत परिणाम होतो..‘ॲस्पिरेशन न्यूमोनिया’ची लक्षणेऔषध पाजताना ठसका लागून जास्त प्रमाणात औषध श्वसनसंस्थेत गेल्यास तात्काळ जनावर मृत्यूमुखी पडते.ज्या जनावरांना औषध पाजताना कमी ते मध्यम स्वरूपाचा ठसका लागून औषध श्वसनसंस्थेत जाते. अशा जनावरांत आजाराची लक्षणे दिसून येतात.बाधित आजारी जनावर कळपातून वेगळे होणे, ठसकणे किंवा वारंवार खोकणे अशी लक्षणे दिसून येतात..Livestock Health Care: गाई, म्हशीमध्ये तिवा आजाराचा प्रसार कसा होतो?.बाधित जनावरांना १०४ ते १०५ अंश फॅरनहाइट ताप येतो.फुप्फुसांना इजा झाल्यामुळे बाधित जनावराला श्वास घेताना त्रास होतो. ते जोरजोरात किंवा धाप लागल्यासारखा श्वास घेतात. तीव्र आजार असल्यास जनावरे अगदी तोंड उघडून जीभ बाहेर काढून श्वास घेताना दिसतात.श्वासाचा वेग (४० ते ६०/मिनिटे किंवा जास्त) तसेच हृदयाचे ठोके वाढलेले दिसून येतात.बाधित जनावरांचे खाणे-पिणे बंद होते. दुधाळ जनावरांचे दुग्धोत्पादन कमी होते..मध्यम ते तीव्र आजार असल्यास डोळे व श्लेष्मल त्वचा निळसर रंगाची दिसते. नाकातून पू युक्त तर काहीवेळा रक्तमिश्रित स्राव येतो.काही जनावरांच्या नाकातून येणाऱ्या द्रवास औषधाचा वास येतो.गंभीर आजारी जनावरे खाली बसून राहतात. योग्य काळजी, उपचार न घेतल्यास आणि काही वेळा उपचार करूनही काही जनावरे २ ते ५ दिवसांत दगावण्याची शक्यता असते..Livestock Care : जनावरांच्या खुरांकडे नको दुर्लक्ष.आजाराचे निदानप्रामुख्याने पशुपालकाकडून संकलित करण्यात येणारी माहिती (औषधे पाजताना जनावराला ठसका लागणे) आणि बाधित जनावरातील लक्षणे (श्वास घेताना त्रास, जोरजोरात किंवा धाप लागल्यासारखा श्वास घेणे किंवा तोंड उघडून श्वास घेणे) याद्वारे आजाराचे निदान करता येते. परंतु त्याची तीव्रता जाणून घेण्यासाठी रक्त व क्ष-किरण तपासणी करणे आवश्यक असते..उपचार आणि प्रतिबंधबाधित जनावराचे पशुवैद्यकाकडून निदान करून तात्काळ आवश्यक उपचारपद्धती अवलंबणे महत्त्वाचे आहे. यामध्ये व्यापक-प्रभाव असणारी प्रतिजैविके, वेदनाशामक-ज्वरविरोधक औषधे देणे आणि आवश्यकतेनुसार ऑक्सिजन थेरपी, सलाईन नेब्युलायझेशन इत्यादी उपाययोजना अमलात आणता येतात.गोठा स्वच्छ व हवेशीर ठेवावा..ज्या जनावरांना तोंडावाटे औषधे देणे आवश्यक आहे अशा जनावरांना पातळ औषधे हळूहळू द्यावीत.जनावरांना औषधे पाजताना जनावर शांत व व्यवस्थित पकडलेले असावे. डोके योग्य स्थितीत ठेवावे..दुधाळ जनावरांना औषधे शक्यतोपशुवैद्यकांच्या सल्ल्याने आणि काळजीपूर्वक द्यावीत.शक्य झाल्यास औषधे पाजण्याऐवजी खाद्याद्वारे द्यावी, जेणेकरून औषध श्वसननलिकेत जाण्याचा धोका कमी होईल..पशुपालक आणि गोठ्यातील मजूर यांना जनावरांना पातळ औषधे पाजताना घ्यावयाची काळजी आणि ठसका लागल्यास निर्माण होणारा प्राणघातक ॲस्पिरेशन न्यूमोनियाबद्दल सखोल माहिती असणे गरजेचे आहे.- डॉ. रवींद्र जाधव, ९४०४२७३७४३ (सहायक प्राध्यापक, पशुवैद्यकीय चिकित्सालयीन औषधशास्त्र, नीतिशास्त्र व न्यायशास्त्र विभाग,क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.