Kharif Season 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season 2025: महाराष्ट्रात खरीप पेरणीची गती वाढली; पावसाची चिंता मात्र कायम

Maharashtra Farming: महाराष्ट्रात जून २०२५ च्या चौथ्या आठवड्यानंतरही शेतकरी कापूस लागवडीत सावधगिरी बाळगत आहेत, तर सोयाबीनची लागवड आघाडीवर आहे. पावसाच्या सुरुवातीच्या जोरदार हजेरीनंतर आलेल्या खंडामुळे कापसाची लागवड ५८ टक्क्यांवर, तर सोयाबीन ६२ टक्क्यांवर पोहोचली आहे.

Sainath Jadhav

Pune News: महाराष्ट्रात जून २०२५ च्या चौथ्या आठवड्यानंतरही शेतकरी कापूस लागवडीत सावधगिरी बाळगत आहेत, तर सोयाबीनची लागवड आघाडीवर आहे. पावसाच्या सुरुवातीच्या जोरदार हजेरीनंतर आलेल्या खंडामुळे कापसाची लागवड ५८ टक्क्यांवर, तर सोयाबीन ६२ टक्क्यांवर पोहोचली आहे.

कृषी विभागाच्या अहवालानुसार, २७ जूनपर्यंत ७६ लाख ३१ हजार हेक्टरवर पेरणी झाली, जी गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. मात्र, पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी थांबवली होती, आणि आता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने पेरणीला वेग आला आहे. पुढील काळात कसा पाऊस पडतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्याच्या कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार, २७ जूनपर्यंत एकूण ७६ लाख ३१ हजार हेक्टर क्षेत्रावर पिक लागवड झाली आहे, जे गेल्या वर्षीच्या ७३ लाख ८३ हजार हेक्टरच्या तुलनेत अधिक आहे. विशेष म्हणजे, कपाशीची लागवड ५८ टक्के क्षेत्रावर तर दुसरीकडे सोयाबीनची लागवड यंदा ६२ टक्के क्षेत्रावर झाली आहे.

यंदा पाऊस लवकर सुरु झाला, पण त्यानंतर जूनचा दुसरा आणि तिसरा आठवडा कोरडा गेला. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यात १० टक्के अधिक पर्जन्यमान नोंदवले गेले असून १७० मिमीच्या सरासरीच्या तुलनेत १८७.३३ मिमी पाऊस झाला आहे. मात्र, यातील बहुतांश पाऊस जूनच्या पहिल्याच आठवड्यात पडला.

नंतर पावसाचा जोर कमी झाला, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी थांबवून पावसाची वाट पाहिली.आता चौथ्या आठवड्यात पावसाने काही ठिकाणी हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी परत पेरणीला सुरुवात केली.मे महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना सुरुवातीला आशा निर्माण झाली होती.

तरीही, कृषी विद्यापीठांनी १५ जूननंतरच पेरणी करावी असा सल्ला दिला होता. सध्या सर्व पिकांची अवस्था समाधानकारक आहे आणि कुठेही दुबार पेरणीची गरज भासणार नाही. तरीही, पावसाचा पुढील टप्पा वेळेवर आणि पुरेसा न झाल्यास पिकांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.शेतकऱ्यांचे लक्ष आता पावसाच्या पुढील फेरीकडे लागले आहे, कारण त्यावरच खरीप हंगामाचे भविष्य अवलंबून आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik Onion Raid: ‘नाफेड,’ ‘एनसीसीएफ’च्या कांदासाठा तपासणीसाठी धाडी

Ginger Price: आले दरात सात हजार रुपयांपर्यंत सुधारणा

Nafed Onion Procurement: अवसायनात गेलेल्या कांदा खरेदी करणाऱ्या संस्थेवरील कारवाईस स्थगिती

Agriculture University Recruitment: कृषी विद्यापीठातील भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणावी

Horticulture Scheme: फलोत्पादन प्रकल्पासाठी २५ कोटींपर्यंत अनुदान

SCROLL FOR NEXT