Deprived of Subsidy : दुबार पेरणी करणारे हरभरा उत्पादक अनुदानापासून वंचित

The farmers complained to the Collector : तेल्हारा तालुक्यातील हिंगणी बुद्रुक, हिंगणी खुर्द, हिंगणी हयातपूर येथील हरभरा दुबार पेरणी केलेले शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
The farmers complained to the Collector
The farmers complained to the CollectorAgrowon
Published on
Updated on

Akola News : तेल्हारा तालुक्यातील हिंगणी बुद्रुक, हिंगणी खुर्द, हिंगणी हयातपूर येथील हरभरा दुबार पेरणी केलेले शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी म्हटले आहे, की हिंगणी बुद्रुक, हिंगणी खुर्द, हिंगणी ह्यातपूर येथील शेतकऱ्यांना सन २०२३-२४ च्या रब्बी हंगामात पावसामुळे हरभऱ्याची दोन वेळा पेरणी करावी लागली.

शासनाने दुबार पेरणी केलेल्या शेतक‌ऱ्यांना अनुदान जाहीर केले. परंतु गावातील तलाठी व अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची पाहणी न करता अनुदान वाटप केले. जे शेतकरी अनुदानास पात्र होते त्या कोणालाही अनुदान देण्यात आलेले नाही.

The farmers complained to the Collector
Milk Subsidy Strike : दूध अनुदानासाठी बुधवारपासून उपोषण

परंतु जे शेतकरी अनुदानास पात्र नव्हते आणि त्यांच्या शेतात हरभऱ्याशिवाय इतर पीक लावलेले असताना सुद्धा त्यांना हरभरा दुबार पेरणीचे अनुदान मिळाले. अशा प्रकारे ६५० शेतकऱ्यांना अनुदान वाटप केले.

The farmers complained to the Collector
Summer Sowing : उन्हाळी पिकांची १६ हजार हेक्टरवर पेरणी

याबाबत विचारणा केली असता वारंवार उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. या सर्व प्रकारामध्ये लालसेपोटी अनुदान यादी बनवण्यात आली. यापूर्वी सुद्धा अनुदान यादीमध्ये अनेकदा अफरातफर झाली आहे.

पात्र शेतकत्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे, असेही निवेदनात म्हटले. याबाबत रघुनाथ कोरडे, विष्णू निवृत्ती खडसे, रमेश महादेव कोरडे, सचिन कोरडे, दीपक कोरडे, नवनाथ भिसे, सुरेश कोरडे, भास्कर खानझोडे, अरूण गावंडे, दीपक वाघ, सुधाकर कोरडे, महादेव कोरडे आदींनी हे निवेदन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com