Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Farming : ‘केव्हीके’च्या पुढाकाराने दोनद येथे कापूस शेतीदिन

Cotton Crop : कापूस पीक प्रकल्पाअंतर्गत शेतावर उत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग, तसेच इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने वाशीम कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने मंगळवारी (ता. २६) कापूस पीक शेतीदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

Team Agrowon

Washim News : कापूस पीक प्रकल्पाअंतर्गत शेतावर उत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग, तसेच इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने वाशीम कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने मंगळवारी (ता. २६) कापूस पीक शेतीदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कारंजा तालुक्यातील दोनद येथे हा कार्यक्रम झाला.

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत (नवी दिल्ली) केंद्रीय कापूस पीक संशोधन संस्था (नागपूर) आणि कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग अनुसंधान संस्थान (पुणे) यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रवींद्र काळे होते.

मार्गदर्शक म्हणून केव्हीकेचे कृषीविद्या तज्ज्ञ व कापूस पीक प्रकल्पाचे नोडल अधिकारी टी. एस. देशमुख उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे संचालक देवेंद्र राऊत, संतोष गुल्हाने, निरंजन करडे व प्रयोगशील शेतकरी किशोर खराटे यांची उपस्थिती होती.

डॉ. काळे यांनी कृषी विज्ञान केंद्राद्वारे राबविण्यात येणाऱ्या कापूस पीक प्रकल्पाबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांना प्रसारित क्षेत्रीय वातावरणानुकूल तंत्रज्ञानाचा उपयोग करून कापसाचे उत्पादन वाढविण्याचा सल्ला दिला.

कृषीविद्या तज्ज्ञ श्री. देशमुख यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकाच्या तांत्रिक पद्धती, स्वच्छ कापूस वेचणीच्या महत्त्वाबरोबरच कापूस पीक पश्चात शेडर यंत्राच्या वापराचे फायदे समजावून सांगितले. त्यांनी शेडर यंत्राचा उपयोग करून पिकाच्या कुट्टीद्वारे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यावरही भर दिला.

श्री. खराटे यांच्या शेताला भेट देऊन तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना कापूस पिकाच्या अतिघनता लागवड तंत्रज्ञानाची माहिती दिली. शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवांचे कथन करत केव्हीके वाशिमच्या प्रयोग कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन अक्षय गिरी यांनी केले. शिवाजी वाघ यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT