Cotton Bales Production : खानदेशात दोन लाख कापूसगाठींचे उत्पादन

Cotton Market : खानदेशात यंदा कापसाचे उत्पादन कमी आहे. यातच कापूस गाठींची निर्मिती सुरू असून, खानदेशातील प्रक्रिया उद्योगात सुमारे दोन लाख कापूसगाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन झाले आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात यंदा कापसाचे उत्पादन कमी आहे. यातच कापूस गाठींची निर्मिती सुरू असून, खानदेशातील प्रक्रिया उद्योगात सुमारे दोन लाख कापूसगाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन झाले आहे.

रोगराईमुळे कापूस उत्पादकतेत घट होत असल्याने रुईच उत्पादनही कमी येईल, असे दिसत आहे. कारण दिवाळीनंतरच्या काळात खानदेशात कापूस प्रक्रिया उद्योग गतीने कार्यरत असतो. परंतु यंदा कापूसपुरवठा कमी असल्याने प्रक्रिया कमी आहे.

Cotton Market
Cotton Market : वरोरा भागात कापसाला ७१५० रुपयांचा दर

पाऊस ऑक्टोबरमध्ये व त्यापूर्वीही सतत सुरूच राहिल्याने कापूस पिकाला फटका बसला आहे. यात कापसाचे उत्पादन कमी होत आहे. कारखानदार व इतर संस्थांना कापूस कमी मिळत असल्याने रूई उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नसल्याची स्थिती आहे. खानदेशात सुरुवातीपासून कापूस आवक कमी आहे.

खानदेशात सध्या प्रतिदिन १० ते १२ हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी १८ हजार क्विंटल कापसाची आवक मागील हंगामात झाली होती. या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कापसाची आवक कमीच होती. दिवाळी व निवडणुका यामुळेही कारखाने संथ गतीने सुरू होते.

Cotton Market
Cotton Market : ‘सीसीआय’ केंद्रावर मुहूर्ताला १४ क्‍विंटल आवक

परंतु खेडा खरेदी अजूनही संथ आहे. कारण कापूस उत्पादन कमी असल्याने फारसा कापूससाठा शेतकऱ्यांकडे नाही. अनेकांनी कापूस पीक काढून त्यात पाण्याच्या उपलब्धतेनुसार हरभरा, गहू, मका आदींची लागवड केली आहे. यामुळे कापूस वेचणी हंगाम अनेक गावांत आटोपला आहे.

यामुळे पुढे कापूस आवकेबाबत गावोगावी फारशी सकारात्मक स्थिती नाही. कापूस आवकेत कुठलीही वाढ या महिन्यातही झालेली नाही. कोरडवाहू कापूस पिकात वेचणी डिसेंबरमध्ये वेगात होईल. पण त्यातही उत्पादन कमी दिसत आहे. डिसेंबर महिन्यात आवकही बऱ्यापैकी राहील, असे जाणकार सांगत आहेत. परंतु ही आवक मागील हंगामाच्या तुलनेत कमी राहणार आहे.

शेतकऱ्यांकडील साठा घटला

शेतकऱ्यांकडे सध्या खानदेशात कापूससाठा फारसा नाही. अनेकांनी कापूस वेचणीनंतर काही दिवसांत त्याची विक्री केली. काही भागात वेचणीनंतर लागलीच कापसाची विक्री झाली. कापूस कारखानदारांकडे येण्याची गती काही दिवस होती. पण आवक कमी होती. शेतकऱ्यांकडील साठा घटला आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांकडेही कापूस गेल्यानंतर पुढे गाठींची निर्मिती फारशी नाही. यामुळे कापूस गाठींचे उत्पादन खानदेशात यंदा घटेल, असे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com