Cotton Bale Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Shortage: कापूसगाठींचे उत्पादन खानदेशात घटले

Cotton Bale Production: खानदेशातील प्रक्रिया उद्योगात सुमारे १८ लाख कापूसगाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन या हंगामात (सप्टेंबर २०२५ अखेर) होईल, असे दिसत आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

थोडक्यात माहिती...

  • खानदेशात कापसाचे उत्पादन यंदा घटले असून, गाठींची संख्या १८ लाखांपर्यंत पोहोचणार नाही.

  • पाऊस, रोगराई आणि कमी लागवड यामुळे कापूस प्रक्रिया उद्योगांवर मोठा परिणाम झाला आहे.

  • कारखाने संथ गतीने सुरू असून काही बंद आहेत; कापूससाठाही जवळजवळ संपलेला आहे.

  • २०२४ मध्ये कापसाची लागवड सुमारे ६६ हजार हेक्टरने कमी झाली.

  • या परिस्थितीमुळे रूई उत्पादनाचे उद्दिष्ट अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.

Jalgaon News: खानदेशात यंदा कापसाचे उत्पादन कमी आहे. यातच कापूस गाठींची निर्मिती कापसाचा अभाव असल्याने संथ गतीने सुरू असून, खानदेशातील प्रक्रिया उद्योगात सुमारे १८ लाख कापूसगाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन या हंगामात (सप्टेंबर २०२५ अखेर) होईल, असे दिसत आहे.

दरवर्षी खानदेशात कापूस हंगामात २२ ते २३ लाख कापूस गाठींचे उत्पादन येते. पण उत्पादनात मागील काही वर्षांत सतत घट येत आहे. जळगाव जिल्ह्यात २०२४ मध्ये घटलेली कापूस लागवड व रोगराईमुळे कापूस उत्पादकतेत घट दिसत आहे. रूईचे उत्पादनही कमी येईल, हेदेखील निश्चित आहे.

कारण २०२४-२५ चा कापूस हंगाम सप्टेंबर २०२५ मध्ये पूर्ण होईल. सध्या कापूस आवक नाही. कमाल कापूस प्रक्रिया उद्योगांतील कार्यवाही संथ आहे. काही कारखाने बंद आहेत. दिवाळीनंतरच्या काळात खानदेशात कापूस प्रक्रिया उद्योग गतीने कार्यरत असतो. परंतु यंदा कापूसपुरवठा कमी असल्याने प्रक्रिया संथ गतीनेच सुरू होती.

मागील वर्षी पाऊस ऑक्टोबरमध्ये व त्यापूर्वीही सतत सुरूच राहिल्याने कापूस पिकाला फटका बसला. यात कापसाचे उत्पादन कमी झाले. लागवडदेखील २०२४ मध्ये जळगावात सुमारे ६६ हजार हेक्टरने कमी झाली होती. एकूण कापूस लागवड जळगावात पाच लाख ११ हजार हेक्टरवर होती. त्यात कारखानदार व इतर संस्थांना कापूस कमी मिळाल्याने रूई उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही.

सध्या कापसाची आवक नाही. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी १८ हजार क्विंटल कापसाची आवक होती. ती जूनच्या मध्यापर्यंत होती. आता गावोगावी कापूस नसल्याने खेडा खरेदी फारशी नाही. शेतकऱ्यांकडे कापूससाठा नाही. त्यामुळे कापूस उत्पादन यंदा १८ लाख गाठींवर जाणार नाही, अशी स्थिती आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):

१. खानदेशात यंदा कापसाचे उत्पादन का घटले?
पावसाचा फटका आणि रोगराई यामुळे लागवड व उत्पादनात घट झाली.

२. किती कापूसगाठी तयार होणार आहेत?
अंदाजे १८ लाख गाठींचे उत्पादन होईल, परंतु तेही अपूर्ण राहू शकते.

३. कपाशी प्रक्रिया उद्योगांना कसा फटका बसतो?
पुरेशा कापूसपुरवठ्याअभावी कारखाने संथ गतीने सुरू आहेत किंवा बंद आहेत.

४. कापूस साठा शेतकऱ्यांकडे का नाही?
कमकुवत उत्पादनामुळे शेतकऱ्यांकडे साठा राहिलेला नाही.

५. कधीपासून ही समस्या जाणवायला लागली?
२०२४ मध्ये लागवड कमी झाल्यापासून व पावसामुळे हिवाळ्यातून ही समस्या गंभीर झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Relief: राज्यात नुकसानीपोटी ३३७ कोटींची मदत

Maharashtra Rain: कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

Group Farming : स्थलांतराला गटशेतीचा पर्याय

Farm Road Registration : महिला शेतकऱ्याला शेत रस्ता नोंदीचा पहिला सातबारा

Agriculture Irrigation : शेती सिंचनासाठी विशेष अभियान

SCROLL FOR NEXT