
Chhatrapati Sambhajinagar News : उत्पादित कापूस आधारभूत किमतीने सीसीआयच्या माध्यमातून खरेदी केला जातो. यामध्ये निर्यातक्षम हाय फायबरयुक्त कापूस वाणांवर विशेष लक्ष द्यावे लागते. कापूस उत्पादकता वाढीसाठी तसेच नवीन बीज निर्मितीसाठी काम सुरू आहे. कॉटन मिशनला मंजुरी दिली आहे.
कापसाच्या उत्पादन वाढीसह कापूस उत्पादकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार व कृषी मंत्रालय काम करत असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर येथे गुरुवारी (ता.२०) ते पत्रकारांशी संवाद साधत होते. या वेळी राज्याचे मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड आदींची उपस्थिती होती.
श्री गोयल म्हणाले, की २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र म्हणून पुढे आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. विकसित मराठवाडा व महाराष्ट्र हा देशाला विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल. जनतेचा पैसा योग्यरीत्या कामी लावला जावा असे सरकारचे प्रयत्न आहेत. जिथे जिथे औद्योगिक क्षेत्रात जमीन दिल्या त्यांचा अभ्यास करून तिथे त्यांनी प्रोजेक्ट सुरू केला नसेल तर त्यांची माहिती मागण्याचे निर्देश दिले आहेत.
औद्योगिक वसाहतीत सर्व सुविधा दिल्या जात आहेत. झपाट्याने औद्योगिक विकास होणाऱ्या २० शहरांपैकी छत्रपती संभाजीनगर पहिल्या चारमध्ये आहे. औद्योगिक क्षेत्रात वेगळी क्रांती आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. १०० वेगवेगळे नवीन औद्योगिक हब बनवण्याचे काम सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑरिक सिटीत ७००० कोटी रुपयांची गुंतवणूक आली व येते आहे. यामधून किमान २ लाख युवा, युतींना रोजगार मिळेल. कौशल्य विकास, रोजगाराची संधी, शिक्षण, स्टार्टअपला प्रोत्साहन, अनुसंधानवर सरकारचा विशेष भर आहे. ऑरिक सिटीत २० हजार स्क्वेअर फूटमध्ये कौशल्य विकास केंद्र बनविणार आहोत. शिवाय इन्क्युबॅशन सेंटरही तयार करणार आहोत, असेही ते म्हणाले.
‘जे चुकीचे होते, त्यांचे अनुदान बंद’
अमेरिकेतील निवडणुकीनंतर आपल्याशी स्पर्धा करणाऱ्या इतर देशांचा रुपया घसरला. अशा स्थितीत भारताचा रुपया सुधारला. आपल्याकडे विदेशी मुद्रा होत्या, रेकॉर्ड पर्यटन, निर्यात, फिक्स डिपॉझिट त्यामुळे आपला रुपया चांगला कार्य करू शकला. जे लोक चुकीचे काम करत होते त्यांचे अनुदान बंद झाले असेल तर आनंदाची गोष्ट असल्याचे मंत्री गोयल यांनी या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.