Control of Weevil  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Management : भातावरील गादमाशीचे नियंत्रण

Control of Weevil : गादमाशीचा प्रादुर्भाव रोपवाटिकेमधूनच सुरू होतो. सप्टेंबरच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात अधिक प्रमाणात आढळतो.

Team Agrowon

डॉ. ए. व्ही. कोल्हे

Weevil Infestation Management : गादमाशीचा प्रादुर्भाव रोपवाटिकेमधूनच सुरू होतो. सप्टेंबरच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात अधिक प्रमाणात आढळतो. उशिरा रोवणी केलेले धान, ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, ८० ते ९० टक्के आर्द्रता व २६ ते ३० अंश सेल्सिअस तापमान किडीच्या वाढीस अत्यंत पोषक असते. किडींच्या बंदोबस्तासाठी प्रादुर्भावाची लक्षणे माहिती असणे आवश्यक आहे.

ओळख, नुकसान

किडीची प्रौढ माशी डासासारखी दिसते. रंग तांबडा व पाय लांब असतात. तसेच विश्रांती अवस्थेत पंख पाठीवर पूर्णपणे झाकलेले असतात.

गादमाशीची मादी १५० ते २०० अंडी एक-एक प्रमाणे धानाच्या पानाच्या खालच्या भागावर दिसून येतात.

अंड्यातून तीन ते चार दिवसांत अळी बाहेर येते. बेचक्यातून खाली सरकत जाऊन जमिनीलगत वाढणाऱ्या अंकुरात प्रवेश करते.

अळीचा रंग पिवळसर व पांढरा असतो.

अळी वाढत्या अंकुरावर १५ ते २० दिवस पर्यंत खाते. अळी खोडामध्येच कोषावस्थेत जाते. कोषामधून प्रौढ माशी ५ ते ७ दिवसांत बाहेर येते. गादमाशीला एक पिढी पूर्ण करण्यास तीन आठवडे लागतात.

अंड्यातून बाहेर आलेली लहान अळी धानाच्या मुख्य खोडात शिरून बुंध्याजवळ स्थिरावते व त्याच्यावर उपजीविका करते. त्यामुळे मुख्य खोडाची वाढ न होता नळी अथवा चंदेरी पोंगा तयार होतो. अशा पोंग्याना लोंबी धरत नाही. तसेच बुंध्याच्या बाजूला अनेक फुटवे फुटलेले दिसतात.

आर्थिक नुकसानीची पातळी

कायम प्रादुर्भाव होणाऱ्या क्षेत्रात ः एक चंदेरी पोंगा प्रति चौ. मी.

नेहमी प्रादुर्भाव नसणाऱ्या क्षेत्राकरीता ः ५ टक्के प्रादुर्भावग्रस्त फुटवे

व्यवस्थापन

धाना व्यतिरिक्त इतर पूरक खाद्य वनस्पती उदा. देवधान नष्ट करावे.

कापणीनंतर शेतात नांगरणी करून धसकटे नष्ट करावीत.

किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच, रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.

फवारणीद्वारे वापर

खालीलपैकी कोणत्याही एका रासायनिक कीटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. एकच कीटकनाशक पुन्हा पुन्हा वापरू नये. कीटकनाशकांची मात्रा हाय व्हॉल्यूम पंपासाठी ( उदा. नॅपसॅक पंप) आहे.

फिप्रोनिल (५टक्के) २० मिलि किंवा

थायामिथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) २ ग्रॅम किंवा

लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५टक्के) ५ मिलि किंवा

क्लोरपायरीफॉस (२०टक्के प्रवाही) २५ मिलि

बांधीमध्ये वापर

खालीलपैकी कोणत्याही एका रासायनिक कीटकनाशकाची प्रति हेक्टरी बांधीमध्ये ७ ते १० सेंमी पाणी असताना वापर करावा. बांधीतील पाणी ४ दिवस बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. एकच कीटकनाशक पुन्हा पुन्हा वापरू नये.

क्विनॉलफॉस (५ टक्के दाणेदार) १५ किलो किंवा

फिप्रोनिल (०.३ टक्के दाणेदार) १६.६७ ते २५ किलो किंवा

कार्बोफ्युरॉन (३ टक्के दाणेदार) २५ किलो किंवा

क्लोरपायरफॉस (१० टक्के दाणेदार) ५ किलो.

-डॉ. ए. व्ही. कोल्हे, ९९२२९ २२२९४

(कीटकशास्त्र विभाग, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही जि. चंद्रपूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT