Biological Pesticides : जैविक कीटकनाशक असलेल्या सूक्ष्मजीवांच्या चार स्ट्रेन्सची नोंदणी

Strains of Microorganisms : ट्रायकोडर्मा व्हीरीडी व हर्जानियम, बॅसिलस सबटिलीसव सुडोमोनास फ्लुरोसन्स या त्या चार प्रजातींचे हे ‘स्ट्रेन्स’ आहेत.
Biological Pesticides
Biological PesticidesAgrowon
Published on
Updated on

Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि अम्मा असोसिएशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कीटकनाशक म्हणून गुणधर्म व कार्यपद्धती असलेल्या सूक्ष्मजीवांच्या प्रकारांचे (स्ट्रेन्स) नोंदणीकरण केंद्रिय कीटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समितीकडे (सीआयबीआरसी) झाले असून ते संमतही झाले आहे. ट्रायकोडर्मा व्हीरीडी व हर्जानियम, बॅसिलस सबटिलीसव सुडोमोनास फ्लुरोसन्स या त्या चार प्रजातींचे हे ‘स्ट्रेन्स’ आहेत.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि नाशिक येथील अम्मा असोसिएशन यांच्यात जुलै, २०१७ मध्ये जैविक कीडनाशके संशोधन आणि नोंदणीकरणासाठी सामंजस्य करार झाला आहे. याविषयी अधिक माहिती देताना अम्मा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे म्हणाले, की ट्रायकोडर्मा व्हीरीडी व हर्जानियम, बॅसिलस सबटिलीस व सुडोमोनास फ्लुरोसन्स या सूक्ष्मजीवांवर आधारित जैविक कीटकानाशकांवर मी संशोधन केले आहे.

Biological Pesticides
Pesticide Nozzle : फवारणीसाठी योग्य गुणवत्तेच्या नोझलची निवड

त्यातून त्यांच्या चार ‘स्ट्रेन्स’ वेगळ्या करण्यात किंवा शोधण्यात यश मिळाले आहे. याच ‘स्ट्रेन्स’ चे नोंदणीकरण केंद्रिय कीटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समितीकडे (सीआयबीआरसी) झाले आहे. एकाचवेळी चार स्ट्रेन्सचे नोंदणीकरण होणे ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. याच स्ट्रेन्सपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ जैविक कीडनाशकांची निर्मिती व फॉर्म्युलेशन करणार आहे. जैविक कीडनाशकांची कार्यक्षमता, परिणामकारता, विषारीपणा व पर्यावरणपूरकता आदींबाबतचा तपशीलही या संयुक्त करारातून उपलब्ध करण्यात आला आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांचे मार्गदर्शन या प्रकल्पासाठी मिळाले आहे. त्यातून रासायनिक कीडनाशकांचा वापर कमी होऊन पर्यावरणपूरक व रासायनिक अंशविरहीत शेतमाल उत्पादन घेणे शक्य होणार आहे.

Biological Pesticides
Bogus Pesticide : बनावट कीटकनाशके जप्त

विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सात्ताप्पा खरबडे, वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अण्णासाहेब नवले, तत्कालीन वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सी. डी. देवकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. किरणसिंह रघुवंशी, डॉ. संजय कोळसे आणि वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. नारायण मुसमाडे यांचाही या प्रकल्पात सहभाग राहिला आहे. या सूक्ष्मजीवांच्य स्ट्रेन्सच्या नोंदणीसाठी महत्त्वाचा पाठपुरावा करण्यामध्ये अम्मा असोसिएशनचे सचिव डॉ. प्रशांत धारणकर आणि सदस्यांनी मोलाची भूमिका निभावली आहे.

सूक्ष्मजीवांच्या चार स्ट्रेन्सवर आधारित जैविक कीडनाशकांची निर्मिती विद्यापीठाला करता येणार आहे. त्यांच्या वापरातून रासायनिक कीडनाशकांचा वापर कमी होण्यासह खर्चही कमी होणार आहे. अशा अजून पाच स्ट्रेन्सवरही कार्य सुरू आहे.
डॉ. अण्णासाहेब नवले, विभागप्रमुख, वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कॄषी विद्यापीठ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com