Dhananjay Munde and Ravikant Tupkar  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : सततची आंदोलने, पाठपुराव्यामुळे मिळणार पीकविमा

Ravikant Tupkar : बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याची भरपाई भरून काढण्यासाठी पीकविमा मिळावा या उद्देशाने केलेली आंदोलने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

Team Agrowon

Buldhana News : बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याची भरपाई भरून काढण्यासाठी पीकविमा मिळावा या उद्देशाने केलेली आंदोलने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. गत वर्षीच्या खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीचा मोबदला आणि पीकविमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती रविकांत तुपकर यांनी दिली.

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई व पीकविमा शेतकऱ्यांना मिळावा म्हणून तुपकरांनी सातत्याने आंदोलने केली.

चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे केलेले अन्नत्याग आंदोलन व त्यानंतर मुंबई येथील मंत्रालय ताबा आंदोलन व त्यावेळी मुंबईत सह्याद्री अतिथिगृहावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पीकविमा व नुकसान भरपाई देण्याची मागणी मान्य झाली होती. परंतु रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांसह तुपकरांनी पुन्हा एकदा नागपूर अधिवेशनावर धडक दिली होती.

त्यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पीकविमा व नुकसान भरपाई देण्याचे त्यांनी मान्य केले होते. त्यानंतर पीकविम्याची काही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पण अजूनही हजारो शेतकरी पिकविम्यापासून वंचित आहेत. पुन्हा तुपकरांनी १२ जून रोजी कृषिमंत्री मुंडे यांची भेट घेऊन पीकविम्याची मागणी लावून धरली. प्रधान सचिव (कृषी) यांच्याकडेही पाठपुरावा केला. त्यानंतर कृषिमंत्र्यांनी पीकविमा कंपनीला आदेश दिले आहेत. आता

लवकरच पीकविमा जमा करण्याचे कंपनीने मान्य केल्याने आंदोलन व पाठपुराव्याला यश आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

Onion Farmers Issue: ‘बफर स्टॉक’चा कांदा शेतकऱ्यांच्या मुळावर

Sugarcane Transport Rule: ऊस वाहतुकीमध्ये बैलांना क्रूर वागवू नका; साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना

SCROLL FOR NEXT