Orange Crop Insurance : अकोलखेडच्या दोन मंडलांत संत्रा विम्याचा लाभ मिळेना

Agriculture Insurance : अकोट तालुक्यातील उमरा आणि पणज या महसूल मंडलांत संत्रा पिकासाठी मृग बहाराचा विमा हेक्टरी ४० हजार रुपये मंजूर झाला.
Orange Crop Insurance
Orange Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Akola News : अकोट तालुक्यातील उमरा आणि पणज या महसूल मंडलांत संत्रा पिकासाठी मृग बहाराचा विमा हेक्टरी ४० हजार रुपये मंजूर झाला. मात्र, या दोन्ही मंडलांच्या मध्यभागी असलेल्या अकोलखेड मंडलातील संत्रा उत्पादक शेतकरी अद्यापही विमा भेटण्याची प्रतीक्षा करीत आहेत. आपले मंडल वगळले तर नाही ना असा प्रश्‍न याठिकाणचे संत्रा उत्पादक विचारत असून विम्याच्या मुद्यावर लोकप्रतिनिधींसह कृषी अधिकाऱ्यांना निवेदनही दिले.

जिल्ह्यात मृग बहरात संत्रा बागांमध्ये नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी शासनाच्या पीकविमा योजनेतून बागांचा विमाही तेंव्हा काढलेला होता. तालुक्यातील उमरा व पणज मंडलांतील उत्पादकांना विम्याचा लाभ मिळाला असून अकोलखेडमधील शेतकरी अद्यापही लाभापासून वंचित आहेत.

Orange Crop Insurance
Orange Crop Insurance : विमा परताव्यात संत्रा फळगळतीचा निकषच नाही

पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजनेअंतर्गत मृग बहारामध्ये संत्रा पिकासाठी अकोट तालुक्यातील अकोट, उमरा, पणज व अकोलखेड ही महसूल मंडले अधिसूचित करण्यात आली होती. जिल्ह्यासाठी एचडीएफसी ईर्गो जनरल इंशुरन्स कंपनी नियुक्त होती. शासन निर्णयान्वये संत्रा पिकासाठी कमी पाऊस व पावसाचा खंड हे हवामान धोके समाविष्ट करण्यात आले होते.

संत्रा पिकासाठी १५ जून ते १५ जुलै या कालावधीत १२४ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाल्यास नुकसान भरपाई देय होती. मागीलवर्षी संपूर्ण जून महिना कोरडा गेला होता. त्यामुळे संत्र्याचा मृग बहार फुटलाच नाही. या प्रकाराने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Orange Crop Insurance
Orange fruit fall : संत्रा पट्ट्यात पसरली मृगाबाबत अनिश्‍चितता
१५ जून ते १५ जुलै या काळात ७९.१ मिलिमिटर एवढा अत्यल्प पाऊस झाला. तरी देखील मदत मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली आहे. कंपनीने वस्तुस्थिती पाहून शेतकऱ्यांना विमा रक्कम द्यावी.
किशोर पाटील बोंद्रे, संत्रा उत्पादक शेतकरी
गेल्या वर्षी संपूर्ण तालुक्यात पावसाअभावी संत्रा बागांमध्ये उत्पन्न नाही. इतर खरीप पिकांनाही विहिरीचे पाणी देवून पिके वाचवावी लागली. चांगला पाऊस पडला असता तर संत्रा बागा फुटल्या असत्या. कंपनीने आकड्यांचा खेळ खेळू नये. लवकरात लवकर शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यावी.
गजानन डाफे, माजी जिल्हा परिषद सदस्य, अकोलखेड सर्कल
अकोला जिल्ह्यातील अकोलखेड, उमरा आणि पणज या महसूल मंडलांमध्ये गेल्यावर्षी उपरोक्त कालावधीत १२४ मिलिमिटर पेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद हवामान केंद्राच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. कृषी अधिक्षक कार्यालयाचा अहवालही तेच सांगत आहे. त्यामुळे कंपनीने शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा.
राजेश भालतिलक, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अकोट तालुका

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com