Fruit Crop Insurance : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा, डाळिंबासाठी १४ जुलैची मुदत

Crop Insurance Deadline : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२४-२५ अंतर्गत खरीप हंगामासाठी एक जून २०२४ पासून फळपीक विमा भरण्यास सुरुवात झालेली आहे.
Fruit Crop Insurance Scheme
Fruit Crop Insurance SchemeAgrowon
Published on
Updated on

Solapur News : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२४-२५ अंतर्गत खरीप हंगामासाठी एक जून २०२४ पासून फळपीक विमा भरण्यास सुरुवात झालेली असून, त्यात डाळिंब, चिकू, संत्रा, पेरू, लिंबू व सीताफळ या पिकांसाठी जिल्ह्यातील शेतकरी फळपीक विमा भरू शकतात. त्यात सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या डाळिंबासाठी १४ जुलै ही शेवटची मुदत देण्यात आली आहे.

फळपीक विमा योजनेत पेरू ३५०० विमा हप्ता, ७० हजार रुपये संरक्षित रक्कम, लिंबू ४ हजार विमा हप्ता, ८० हजार रुपये विमा संरक्षित रक्कम इतकी आहे. विमा संरक्षित कालावधी १५ जून १५ ऑगस्ट २०२४ असून, विमा भरण्याची अंतिम मुदत २५ जून २०२४ पर्यंत, चिकूसाठी ३५०० रुपये विमा हप्ता, विमा संरक्षित रक्कम ७० हजार रुपये विमा संरक्षित कालावधी एक जुलै ते ३० सप्टेंबर २०२४,

Fruit Crop Insurance Scheme
Fruit Crop Insurance : हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ घ्या

संत्रा ५ हजार रुपये विमा हप्ता, विमा संरक्षित रक्कम एक लाख रुपये विमा भरण्याची अंतिम मुदत ३० जून २०२४ असून, विमा संरक्षित कालावधी १५ जून ते १५ ऑगस्ट २०२४, डाळिंब आठ हजार रुपये विमा हप्ता, एक लाख ६० हजार विमा संरक्षित रक्कम, विमा भरण्याची अंतिम मुदत १४ जुलै २०२४ असून,

Fruit Crop Insurance Scheme
Fruit Crop Insurance : मृग बहार फळपीक विमा योजनेत ई-पीक नोंदणी सक्तीची

विमा संरक्षित कालावधी १५ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२४ इतका आहे. सीताफळसाठी ३ हजार ५०० रुपये विमा हप्ता, ७० हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून, विमा भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२४ आहे. विमा संरक्षित कालावधी १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२४ इतका असणार आहे.

आपले पीक ज्या महसूल मंडलात आहे, त्या महसूल मंडलासाठी सदर पीक अधिसूचित आहे किंवा नाही, याबाबत खात्री करूनच आपल्या पिकाचा विमा भरावा, शेतकऱ्यांनी सातबारा, आठ अ, आधार कार्ड व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे घेऊन जवळच्या सी.एस.सी. केंद्रास विहित कालावधीत भेट द्यावी. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून पीकविमा हप्ता भरण्याबाबत बॅक अधिकाऱ्यांशी संपर्क करावा.
दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com