Employment Guarantee Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Public Hearing : फुलंब्रीत ‘रोहयो’च्या जन सुनावणीत शेतकऱ्यांनी पाडला तक्रारीचा पाऊस

Employment Guarantee Scheme Farmer Complaints : राज्यातील पहिल्या जन सुनावणीमध्ये सुमारे दोनशे शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भोकरे यांच्याकडे तक्रारीचा पाऊस पडला आहे.

Team Agrowon

Phulambri News : फुलंब्री येथील पंचायत समितीच्या सभागृहात रोजगार हमी योजनेच्या राज्यातील पहिल्या जन सुनावणीमध्ये सुमारे दोनशे शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भोकरे यांच्याकडे तक्रारीचा पाऊस पडला आहे. कॅश आणि फोन पे या दोन माध्यमाद्वारे शेतकऱ्याकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. प्रलंबित असलेले प्रकरणे पंधरा दिवसात निकाली काढणार असून पैसे घेतल्याचे पुरावे द्या, त्यांच्यावर योग्य कारवाही करू, असे आश्वासन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भोकरे यांनी बुधवारी (ता. २४) शेतकऱ्यांना दिले आहे.

फुलंब्री पंचायत समितीत रोजगार हमी योजनेमध्ये कंत्राटी अभियंते शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करून पैसे घेऊनही शेतकऱ्यांचे कामे करीत नसल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. याची दखल घेऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भोकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी पंचायत समितीच्या सभागृहात जन सुनावणी घेण्यात आली.

या जन सुनावणीत तालुक्यातील सुमारे तीनशे लाभार्थी उपस्थित होते. यातील सुमारे २०० लाभार्थ्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भोकरे यांच्याकडे रोजगार हमी योजनेत कुशल व अकुशल या दोन्ही कामासाठी शेतकऱ्याकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी केल्या. पैसे घेऊनही काम वेळेवर होत नाही.

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अभियंताच्या तोंडावर कॅश व फोन पे करीत पैसे दिल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे सुनावणीसाठी आलेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भोकरे, विस्ताराधिकारी मंगेश कुटे, विस्ताराधिकारी जी.टी. गवळी, शाखा अभियंता दादाराव दुरपुडे, सुधाकर म्हस्के यांना शेतकऱ्यांना समजावताना नाकी नऊ आले होते.

सर्व शेतकऱ्यांची प्रलंबित असणारी कामे पंधरा दिवसात मार्गी लावून पैसे घेणाऱ्यावर नियमानुसार कारवाई करणार असल्याचे आश्वासन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भोकरे यांनी दिले. यावेळी माजी अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे, उपसभापती दत्तात्रय करपे, जगन दाढे, संतोष पाटील तांदळे, नंदू पाटील मोटे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

जन सुनावणीत अधिकाऱ्यांची दमछाक

रोजगार हमी विभागात अभियंता पैसे घेतल्याशिवाय काम करत नसल्याच्या तक्रारी ऐकून घेताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT