Employment Guarantee Scheme : ‘रोहयो’वरील मजुरांना २४ रुपयांची वाढ

ROHYO Wages : राज्य शासनाने रोजगार हमी योजनेवरील मजुरांची मजुरी प्रतिदिन २४ रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Employment Guarantee Scheme
Employment Guarantee SchemeAgrowon
Published on
Updated on

Nashik News : राज्य शासनाने रोजगार हमी योजनेवरील मजुरांची मजुरी प्रतिदिन २४ रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मजुरांना प्रतिदिन २७३ मिळत होते. यात २४ रुपयांची वाढ झाल्याने आता मजुरांना २९७ रुपये मिळणार आहेत. याच लाभ जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेवर काम करत असलेल्या २६ हजार १७८ मजुरांना होणार आहे.

Employment Guarantee Scheme
Employment Guarantee Scheme : अवकाळीचा फटाका; शेतकऱ्यांची मदार आता ‘रोहयो’वर

केंद्र सरकारने ‘मागेल त्याच्या हाताला काम’ देण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली. योजनेतून सिंचन विहीर, शेततळे, शोषखड्डे, बांधदुरुस्ती, दगडी बांध, वृक्षलागवड, रोपवाटिका, वैयक्तिक वनजमीन पट्ट्यांचा विकास, घरकुल, शौचालय, गोठा, कुक्कुटपालन शेड बांधकाम आदी कामे केली जातात.

Employment Guarantee Scheme
Employment Guarantee Scheme : रोजगार हमी योजनेवर १३ हजार ६५७ मजूर

योजनेत फळबागांसाठी राज्य सरकारने केळी पिकाचा समावेश केला आहे. या योजनेतून गरजूंना वर्षभरात किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध व्हावा, हा मुख्य उद्देश ठेवलेला आहे. आता तर जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये मोठीच वाढ झाली आहे. त्यात २७३ रुपये प्रतिदिवस या मजुरीत मजुरांना काम करणे परवडणारे नव्हते. त्याची दखल घेऊन ही वाढ केली आहे. या वाढीमुळे कामांवर काम करणाऱ्या मजुरांना २७३ रुपयांऐवजी २९७ रुपये प्रतिदिवस मजुरी मिळणार आहे.

जिल्ह्यात सुरू असलेली कामे

जिल्ह्यातील एक हजार ३८५ ग्रामपंचायतींमध्ये ‘मनरेगा’अंतर्गत सद्यःस्थितीत ८१० कामे सुरू आहेत. १ एप्रिल २०२३ ला जिल्ह्यातील अपूर्ण कामांची संख्या ३१ हजार ६२१ होती, १६ जून २०२४ अखेर यातील २८ हजार ५३९ कामे पूर्ण झाली आहेत, तर ३ हजार ८२ कामे अपूर्ण आहेत. या कामांवर २६ हजार १७८ मजूर काम करत आहेत. वाढीव २४ रुपये मजुरीचा विचार करता या मजुरांना प्रतिदिन मिळून सहा लाख २८ हजार २७२ रुपयांचा लाभ होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com