Aslam Abdul Shanedivan
केंद्र सरकारने २०२४-२५ या वर्षासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरीत वाढ केली आहे.
राज्यात ‘मनरेगा’ योजनेअंतर्गत दिवसाला २९७ रुपये मजुरी मिळणार आहे
यासह ‘रोहयो’योजनेअंतर्गत मजुरी करणाऱ्यांना मजुरांना प्रतिदिन २४ रुपये अधिक मिळणार आहेत
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने ‘मनरेगा’ योजनेबाबत २७ मार्च रोजी अधिसूचना जारी केली होती.
तर नवे वेतन दर केंद्रीय ग्रामीण विकास विभागाचे सहसचिव अमित कटारिया यांनी १ एप्रिल २०२४ पासून दिले जातील असे सांगितले होते.
तर ‘रोहयो’ची नवीन मजुरी महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांना लक्षात घेऊन देण्यात आली आहे
‘रोहयो’अंतर्गत गुजरात - २८०, कर्नाटक - ३४९, मध्य प्रदेश - २४३, तेलंगणा - ३०० आणि गोव्यासाठी ३५६ रुपये प्रतिदिन मजुरी असणार आहे