Community Facilitation Center Agrowon
ॲग्रो विशेष

Government Scheme : सामुदायिक सुविधा केंद्र ःसहकारी संस्थांसाठी चांगली संधी

Community Facility Center : सामुदायिक सुविधा केंद्रातील सुविधांमुळे शेतकरी कंपनी, सहकारी संस्था, महिला बचत गट व त्यांचे फेडरेशन यांना सेवा पुरविण्यामुळे व्यवसाय उभारण्याची संधी मिळत आहेत.

Team Agrowon

मिलिंद आकरे,हेमंत जगताप
Government Yojana : सामुदायिक सुविधा केंद्रातील सुविधांमुळे शेतकरी कंपनी, सहकारी संस्था, महिला बचत गट व त्यांचे फेडरेशन यांना सेवा पुरविण्यामुळे व्यवसाय उभारण्याची संधी मिळत आहेत. याच शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे.

सामुदायिक सुविधा केंद्र २.०, ऑगस्ट २०१५ मध्ये मंजूर झाल्यानंतर, २.५ लाख सामुदायिक सुविधा केंद्रांचे स्वयं-शाश्वत नेटवर्क स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील ५ वर्षांत हे लक्ष गाठण्याचा प्रयत्न आहे. या सुविधा केंद्रांतर्गत आणखीही काही सेवा पुरविण्यात येतात.

आर्थिक साहाय्य सेवा ः
बँकिंग बीसी (BC) ः सामुदायिक सुविधा केंद्रामार्फत सेवा देण्याच्या अनुषंगाने विविध बँकांशी भागीदारी करण्यात आली असून, राष्ट्रीयकृत बँका, नागरी सहकारी बँका, खासगी बँका आणि प्रादेशिक बँका यांचेशी करार करण्यात आलेला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची गुंतवणूक आणि भागीदारी ः १) स्टेट बँक ऑफ इंडिया २) सेंट्रल बँक ऑफ इंडिया ३) पंजाब नॅशनल बँक ४) युको बँक ५) बँक ऑफ इंडिया ६) बँक ऑफ बडोदा ७) बँक ऑफ बडोदा.

खासगी क्षेत्रातील बँकांची गुंतवणूक आणि भागीदारी ः १) एचडीएफसी बँक २) ॲक्सिस बँक ३) आयडीबीआय बँक ४) आयसीआयसीआय बँक.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रादेशिक ग्रामीण बँका ः १) बांगिया ग्रामीण विकास बँक २) पंजाब ग्रामीण बँक ३) बडोदा युपी ग्रामीण बँक ४) सर्व हरियाना ग्रामीण बँक ५) बडोदा राजस्थान क्षेत्रीय ग्रामीण बँक, राजस्थान मरुधर ग्रामीण बँक, छत्तीसगड ग्रामीण बँक, उत्कल ग्रामीण बँक, दक्षिण बिहार ग्रामीण बँक, मेघालय ग्रामीण बँक, हिमाचल ग्रामीण बँक, अरुणाचल ग्रामीण बँक, झारखंड ग्रामीण बँक, नैनीताल ग्रामीण बँक, मध्य प्रदेश ग्रामीण बँक, त्रिपुरा ग्रामीण बँक, प्रथमा युपी ग्रामीण बँक, त्रिपुरा राज्य सहकारी बँक त्याच बरोबर महाराष्ट्र राज्यातील बहुतांशी सर्व ग्रामीण बँका, राज्य बँक व जिल्हा बँक यांचेशी करार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून काही करार पूर्ण झाले आहेत.

सुविधा केंद्रामार्फत अर्थ विषयक सेवा ः

ऑनलाइन खाते उघडणे, रोख ठेव, पैसे काढणे, निधी हस्तांतरण, निधी शिल्लक चौकशी, मिनी स्टेटमेंट, आरडी (RD)उघडणे, सूक्ष्म अपघात मृत्यू विमा काढण्यासाठी नाव नोंदणी करणे, मायक्रो लाइफ इन्शुरन्स साठी नावनोंदणी करणे, सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेसाठी नावनोंदणी करणे, धनादेश संकलन, आधार सीडिंग, मोबाईल सीडिंग, फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉण्ड, सीनियर सिटिझन सेव्हिंग योजना, आयएमपीएस, एनिईएफटी, नवीन चेकबुकसाठी विनंती, टिडी/ आरडी चे नूतनीकरण, बँक खाते शिल्लक चौकशी, एसएमएस ॲलर्ट, ईमेल स्टेटमेंट साठी विनंती, जीवन प्रमाणाच्या माध्यमातून जीवन प्रमाणपत्र, रुपे डेबिट कार्ड साठी अर्ज करणे, चेक संकलन, पासबुक अपडेट, म्युचुअल फंडासाठी नोंदणी, पासबुक अपडेट, सुकन्या समृद्धी खाते, सोव्हरीन गोल्ड बॉण्ड, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी नोंदणी.

कर्ज विषयक सुविधा ः
ग्रामीण भागातील लोकसंख्येला बँकेत आर्थिक व्यवहार करताना अडचणींना सामोरे जावे लागते. नागरिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून एचडीएफसी बँक,ॲक्सिस बँक, अदाणी कॅपिटल, आयसीआयसीआय, एलआयसी, कोटक महिंद्रा बँक, पीएनबी, टीव्हीएस क्रेडिट याच्या विविध कर्ज उत्पादनांचा लाभ घेऊ शकतात.

सुविधा केंद्रातर्फे अर्थविषयक सेवा
वाहन कर्ज, व्यवसाय कर्ज, व्यावसायिक वाहन कर्ज, ट्रॅक्टर कर्ज, एमएसई/बिबीजी/ईईजी, सोने कर्ज , गृह कर्ज, शेतकरी सोने कर्ज, मालमत्तेवर कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्डवर कर्ज, लहान शेती व्यवसाय, रोख क्रेडिट, किसान मित्र लोन , सुरक्षित मुदतीचे कर्ज, ओव्हरड्राफ्ट, शैक्षणीक कर्ज, गैर- वैयक्तिक-डेअरी, पोल्ट्री, सीक्युरीटीजवर कर्ज, रिटेल रिमिटन्स, टीएमयूसी.

विमा सेवा ः
नवीन विमा पॉलिसींची विक्री आणि विविध विमा कंपन्यांसाठी प्रिमियम नूतनीकरण सेवा सुविधा केंद्रामार्फत उपलब्ध करण्यात येत आहे. सुविधा केंद्र चालविणाऱ्या सेवा पुरवठादारास विमा देण्याचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.

सुविधा केंद्रामार्फत पुढील उत्पादने उपलब्ध असून त्यात जीवन विमा, पीक विमा, जीवन विमा पॉलिसीचे नूतनीकरण, मोटर विमा, वैयक्तिक अपघात विमा, मालमत्ता विमा, आरोग्य विमा, यंग आणि संबंधित संकटे विषयीचा विमा, गोदाम विषयक विमा यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली ः
पेन्शन विषयक सेवा देण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असून सुविधा केंद्रामार्फत आता प्रत्येक घटकातील लोकांना पेन्शनचा फायदा घेत येऊ शकेल.

डिजीपे ः
ही प्रणाली लोकसंख्या शास्त्रविषयक आणि बायोमेट्रिक माहितीवर आधारित असून खात्यातून पैसे काढणे, रोख पैसे जमा करणे, खात्यात शिल्लक पैशांची माहिती, मिनी स्टेटमेंट, मायक्रो एटीएम, देशांतर्गत मनी ट्रान्स्फर, डिजिटल सेवा पोर्टल वॉलेट टॉप-अप आशा प्रकारच्या सेवा पुरविण्यात येतात.

फास्टॅग ः
फास्टॅग हा आरएफआयडी सक्षम रिलोड करण्यायोग्य टॅग असून याद्वारे टोल शुल्काची स्वयंचलित कपात करण्यात येते. वाहनांना रोख व्यवहारासाठी न थांबता टोल प्लाझातून जाता येते.

यामुळे वेळ, पैशांची बचत होते. फास्टॅग हे प्रिपेड खात्याशी जोडलेले असते ज्यामधून लागू टोलची रक्कम आपोआप कापली जाते. फास्टॅग नोंदणीचे काम सुद्धा सुविधा केंद्रामार्फत करून देण्यात येत असून त्याचे रीचार्ज व विक्री सुद्धा करण्यात येते.

कृषी विषयक सेवा ः
सिएससी ई-अॅग्री पोर्टल ः

१) याद्वारे शेतकऱ्यांना आवश्यक सर्व शेतीविषयक वस्तू, शेती अवजारे आणि कृषी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकते.

२) कृषिविषयक कच्चा माल, आणि अवजारांच्या पुरवठ्यासाठी विविध ब्रॅंडसोबत सुविधा केंद्राकरिता शासनामार्फत भागीदारी करण्यात आलेली आहे.

३) सुविधा केंद्रामार्फत कृषी रसायने, जैविक खते, बियाणे, शेतीची अवजारे, ट्रॅक्टर, माती परीक्षण किट, गुरांचा चारा, पाण्यात विरघळणारी खते, अनुदानित आणि विनाअनुदानित खते पुरविण्यात येतात.

अॅग्री टेली-कन्सलटेशेन ः
१) भारतीय कृषी संशोधन परिषद आणि कृषी विज्ञान केंद्रातून सुविधा केंद्रामार्फत शेतकऱ्यांना कृषी दूरसंचार सल्ला दिला जातो. यामध्ये नवीन शेती पद्धती, माती आरोग्य, विविध कृषी आणि बागायती पिकांच्या लागवड पद्धती, खतांची योग्य मात्रा, कीड आणि रोग नियंत्रण, सिंचन यांचा समावेश असतो.

२) पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्यातर्फे जनावरे आणि पाळीव प्राण्यांसाठी ई-पशू चिकित्सा किंवा फोनद्वारे मार्गदर्शन सुद्धा सुविधा केंद्रामार्फत दिले जाते.

३) भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांमार्फत हवामान अंदाज आणि कृषी सल्लागार सेवा सुविधा केंद्रामार्फत पुरविण्यात येतात.

माती परीक्षण केंद्र ः
१) सीएससी किंवा सुविधा केंद्रामार्फत भूमी प्रयोगशाळांच्या माध्यमातून माती परीक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या मातीच्या नमुन्यांमधून मुख्य व सूक्ष्म मूल्यद्रव्ये तपासून योग्य प्रमाणात खते वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्यानुसार शिफारशी केल्या जातात.

किसान- ई मार्ट ः
१) शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल थेट खरेदीदारांना विकण्यास मदत करण्यासाठी सुविधा केंद्रामार्फत किसान-ई मार्ट प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेला आहे. यामार्फत थेट शेतकऱ्यांशी व्यवहार करण्यात येतो परंतु यामध्ये मध्यस्थांना स्थान दिले जात नाही.

२) सुविधा केंद्र शेतकऱ्याला त्याच्या शेतीमालाच्या विक्रीसाठी खरेदीदाराशी जोडण्यास मदत करते.

किसान क्रेडिट कार्ड ः
१) किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना शेती विषयक, मत्स्यपालन आणि पशुपालन क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण गरजा पूर्ण केल्या जातात.

२) या कार्डद्वारे अल्पमुदतीचे कर्ज कमी व्याजदरावर दिले जाते.

३) किसान क्रेडिटकार्ड विषयक सर्व सेवा सुविधा केंद्रामार्फत दिल्या जातात.

संपर्क ः प्रशांत चासकर,९९७०३६४१३०
(शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT