Career Counseling : सामुदायिक विज्ञान क्षेत्रात करिअर संधी

Career opportunities : बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी करियरच्या नवीन वाटा माहिती करून घेण्यास अतिशय उत्सुक असतात. यापैकीच एक आहे सामुदायिक विज्ञान (कम्युनिटी सायन्स) अभ्यासक्रम.
Education Information
Education InformationAgrowon
Published on
Updated on

डॉ. जया बंगाळे

Education update : बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी करियरच्या नवीन वाटा माहिती करून घेण्यास अतिशय उत्सुक असतात. यापैकीच एक आहे सामुदायिक विज्ञान (कम्युनिटी सायन्स) अभ्यासक्रम.महाराष्ट्र राज्यातील चार कृषी विद्यापिठापैकी केवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

महाराष्ट्र शासनाने सामुदायिक विज्ञान हा अभ्यासक्रम कृषी विद्यापीठातील इतर पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य असल्याबाबतचा शासन निर्णय सन २०२१ मध्ये निर्गमित केला आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमातील नोकरी-व्यवसायांच्या संधीत वाढ झाली आहे.

१) सामुदायिक विज्ञान हा व्यावसायिक अभ्यासक्रम असल्याने तो पूर्ण करण्यासाठी चार वर्षाचा कालावधी लागतो. हा पदवीपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना बी.एससी (ऑनर्स) कम्युनिटी सायन्स ही पदवी मिळते. कोणत्याही सामान्य पदवीपेक्षा ऑनर्स पदवीला विशेष महत्त्व आहे.

कारण ही पदवी प्राप्त करताना विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयांशी निगडित प्रत्यक्ष अनुभव देण्यावर अधिक भर असल्यामुळे असे विद्यार्थी स्वत:च्या नोकरी - व्यवसायात अधिक यशस्वी होतात.

२) कृषी विद्यापीठात असलेल्या सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून लवकरच प्रवेश फेऱ्या सुरु होणार आहेत.

Education Information
Right To Education : ‘आरटीई’अंतर्गत राज्यात पंचवीस हजार जागा रिक्त

प्रवेश पात्रता :

१) इ. १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा तसेच सक्षम प्राधिका­याकडून आयोजित करण्यात आलेली एम एचटी सीईटी/जेईई/नीट सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली असणे अनिवार्य असून मुला-मुलींसाठी प्रवेश खुला आहे.

२) शासनाने जाहीर केलेल्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना दिला जातो. महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे येथील विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्क माफ केले आहे.

करिअर संधी :

१) जिल्हा रुग्णालय, दवाखाना, क्रीडा कार्यालय, व्यायामशाळा, केंद्रीय राखीव पोलिस दल, रेल्वे विभाग इत्यादी ठिकाणी आहार तज्ज्ञ याबरोबरच महाराष्ट्र महिला व बाल विकास अधिकारी, आयसीडीएस पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक, प्रशिक्षक, प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, बँक तथा भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ (IIPH) इत्यादीमध्ये शासकीय, निमशासकीय तथा खासगी स्तरावरील विविध योजना व संस्थामध्ये कार्य करण्याच्या मुबलक संधी.

२) या अभ्यासक्रमात स्किल इंडिया मिशनला अनुसरून स्टार्टअपला चांगला वाव. विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या दर्जेदार पूर्व प्राथमिक शाळा, पाळणाघरे, आहार सल्ला केंद्र, कौटुंबिक मार्गदर्शन केंद्र, समुपदेशन केंद्र, इंटेरियर डिझायनिंग, बेकरी व कन्फेक्शनरी युनिट, कॅन्टीन, मेस, बुटीक, हॅन्डीक्राप्टस युनिट, इव्हेन्ट मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग यासारखे व्यवसाय सुरु करण्यासाठी सक्षम केले जाते.

३) अन्न प्रक्रिया व साठवणूक, हेल्थ क्लब, लॅन्डस्केप प्लॅनिंग, फर्निचर डिझायनिंग, निवासस्थाने, व्यावसायिक संस्था व दवाखाने, मॉल्स आदींसाठी गार्डन डिझायनिंग, पुष्प रचना, पुष्पगुच्छ निर्मिती, गिफ्ट पॅकेजिंग, इको टुरिझम, बालकांसाठी शैक्षणिक साहित्य व खेळणी निर्माण हाऊस कीपिंग यासारख्या अभिनव क्षेत्रातही विद्यार्थ्यांना करिअर संधी.

Education Information
Life Education Activities : आधुनिक मानसशास्त्रावर आधारित जीवन शिक्षण उपक्रम

शिक्षण, नोकरीच्या संधी :

१) अभ्यासक्रमाचे पदवीधर एमबीए साठी पात्र असून त्यांना नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (NAARM) संस्थेतून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पदव्युत्तर अभ्यासक्रम याव्यतिरिक्त ते त्यांच्या आवडीच्या विषयात जसे की , स्पेशल एज्युकेटर, स्पीच थेरपी, बाल व कौटुंबिक समुपदेशन, इंटेरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, स्कूल कॉउन्सलर इ. डिप्लोमा अभ्यासक्रम करुनही करिअर घडविण्याच्या संधी.

२) अभ्यासक्रमाचे पदवीधर एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांसाठी देखील पात्र आहेत.

स्वायत्त व आंतरराष्ट्रीय संस्थामधील संधी :

१) किशोर न्यायालय(JJB), केंद्रीय समाज कल्याण मंडळ, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद(NCERT), राष्ट्रीय सहकार्य व बालविकास संस्था(NIPCCD), युनिसेफ, यूएनडीपी, युएसडी, एफएओ, डब्ल्युएचओ यासारख्या संस्थामध्येही करियरच्या संधी.

आव्हानात्मक क्षेत्रात कार्य करण्यास वाव :

१) आजच्या धकाधकीच्या जीवनात ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर होम तथा त्यांच्या स्वत:च्या घरीच त्यांच्या घ्यावयाच्या काळजी विषयक सेवा, कुटुंबातील दिव्यांग बालके/व्यक्ती यांच्यासाठी विशेष सेवा व इंटरव्हेन्शन यासारख्या आव्हानात्मक क्षेत्रातही विद्यार्थी आपले करिअर घडवण्याबरोबरच समाजाला अतिशय निकड असलेल्या सेवा प्रदान करु शकतात.

२) स्पर्धात्मक युगात नोकरी-व्यवसाय तथा वैयक्तिक जीवनात आनंदी व यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी जीवन कौशल्ये, सॉफ्ट स्किल्स विकसित करण्याकरिता अभ्यासक्रमाचा लाभ घेतल्यास विद्यार्थ्यांसाठी अनेक करियरच्या वाटा खुल्या आहेत.

प्रवेश आणि माहितीसाठी वेबसाइट http:// www.mcaer.org

संपर्क - डॉ. जया बंगाळे,७५८८०८२०५६, (सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, मानव विकास विभाग प्रमुख, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com