Crop Loan : ग्रामीण बँक, जिल्हा बँकेची पीककर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती

Distribution of crop loans : परभणी जिल्ह्यात खरीप हंगामात ३१ जुलैअखेर परभणी जिल्ह्यातील ८२ हजार ७६१ शेतकऱ्यांना ६३१ कोटी २० लाख रुपये (४५.६० टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Kharif Season : परभणी ः परभणी जिल्ह्यात खरीप हंगामात ३१ जुलैअखेर परभणी जिल्ह्यातील ८२ हजार ७६१ शेतकऱ्यांना ६३१ कोटी २० लाख रुपये (४५.६० टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २०९ कोटी ९४ लाख रुपयाचे उद्दिष्ट असताना २४८ कोटी ६ लाख (११८.१६ टक्के), तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १६४ कोटी ९३ लाख रुपये उद्दिष्ट असताना १६५ कोटी ८४ लाख रुपये (१००.५५ टक्के) पीककर्ज वाटप केले. या दोन बँकांची उद्दिष्टपूर्ती झाली आहे. परंतु राष्ट्रीयीकृत बँका (२२.१७ टक्के) व खासगी बँकांचे (१६.५९ टक्के) पीककर्ज वाटप संथ गतीने सुरू आहे.

जमिनी संपादित केल्या असल्या तरी, त्‍याठिकाणी कोणतेही सरकारी उपक्रम राबवले नसल्‍याने धरणग्रस्त सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. १३ वर्षांत कोणत्याच गावाचे पुनर्वसन झालेले नाही. जमिनीचा मोबदला, पुनर्वसनासाठी प्लॉटची वाटप हे प्रश्न प्रलंबित आहे. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात बाळगंगा धरणग्रस्तांचे प्रश्न उपस्थित होतील, अशी आशा होती, मात्र पुन्हा निराशा झाली. धरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असले तरी प्रकल्पग्रस्तांना मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

सरकारच्या उदासीन धोरणामुळे बाळगंगा धरणग्रस्‍तांचे पुनर्वसन रखडले आहे. प्रकल्पग्रस्‍त न्याय निवाड्यासाठी न्यायालयीन लढ्याच्या तयारीत आहेत. येथील जमिनींचे सातबारे शेतकऱ्यांच्या नावे करण्यात यावीत, त्‍यांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात अन्यथा प्रकल्‍पग्रस्‍तांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.

- अविनाश पाटील, अध्यक्ष, बाळगंगा धरण संघर्ष व पुनवर्सन समिती

Crop Loan
Crop Loan : महाराष्ट्र ग्रामीण बँकेची पीककर्ज वितरणात आघाडी

जिल्ह्यातील विविध बँकांना १ हजार ३८४ कोटी १७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात राष्ट्रीयीकृत बँकांना (व्यापारी बँका) एकूण ८९३ कोटी २६ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला २०९ कोटी ९४ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १६४ कोटी ९३ लाख रुपये, खासगी बँकांना ११६ कोटी ४ लाख रुपये उद्दिष्टांचा समावेश आहे. मंगळवारी (ता. ३१) अखेर राष्ट्रीयीकृत बँकांनी १८ हजार ३२४ शेतकऱ्यांना १९८ कोटी ५ लाख रुपये (२२.१७ टक्के) पीककर्ज वाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २५ हजार ६३८ शेतकऱ्यांना २४८ कोटी ६ लाख रुपये (११.१६ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ३७ हजार १६५ शेतकऱ्यांना १६५ कोटी ८४ लाख (१००.५५ टक्के), खासगी बँकांनी १ हजार ९२५ शेतकऱ्यांना १९ कोटी २५ लाख रुपये (१६.५९ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.

बँकनिहाय पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये)

बँक उद्दिष्ट वाटप रक्कम टक्केवारी शेतकरी संख्या

महाराष्ट्र ग्रामीण बँक २०९.९४ २४८.०६ ११८.१६ २५६३८

जिल्हा सहकारी बँक १६१.९१ १६५.८४ १००.५५ ३७१६५

भारतीय स्टेट बँक ५७२.७७ १२४.०८ २१.६६ ११८६२

बँक ऑफ बडोदा ६५.९७ .८.४७ १२.८५ ९६२

बँक ऑफ इंडिया ११.८२ ३.०९ २६.१४ २६०

बँक ऑफ महाराष्ट्र ७९.९० ३२.९४ ४१.२३ २६५६

कॅनरा बँक ४७.३८ ८.०८ १७.०५ ८९२

सेंट्रल बँक ऑफ इंडिया १२.१२ ४.९४ ४०.७६ ४१८

इंडियन बँक २४.१४ ३.११ १२.८८ ३२४

इंडियन ओव्हरसीज बँक १०.४१ ४.७० ४५.१५ ३९८

पंजाब नॅशनल बँक १०.८६ ०.४८ ४.४२ ४३

युको बँक २३.६८ २.२० ९.२९ २२२

युनियन बँक ऑफ इंडिया ३४.२६ ५.९६ १७.४० २८७

अॅक्सिस बँक १२.५३ ०.२१ १.६८ २

एचडीएफसी बँक ३८.२७ ३.४४ १८.९९ ३१४

आयसीआयसीआय बँक ३०.२१ ९.९८ ३३.०४ ६६२

आयडीबीआय बँक ३५.३ ५.६२ १६.५९ १६३४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com