Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलक्या सरी

Cloudy Weather : मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाचा चटका वाढला आहे. एकीकडे पाण्याची टंचाई आणि दुसरीकडे तापमान वाढल्याने अडचणी वाढल्या आहेत.

मुकूंद पिंगळे

Nashik News : मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाचा चटका वाढला आहे. एकीकडे पाण्याची टंचाई आणि दुसरीकडे तापमान वाढल्याने अडचणी वाढल्या आहेत. अशी बिकट परिस्थिती असताना गुरुवारी (ता. २८) काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या.

शुक्रवारी (ता. २९) सकाळी जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर निफाड, सिन्नर, सटाणा, देवळा, नांदगाव व मालेगाव तालुक्यात हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसल्याने काही ठिकाणी अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या अंदाजानुसार २९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत पुढील पाच दिवसांत हवामान कोरडे व उष्ण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तसेच आकाश पुढील पाच दिवस अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज देण्यात आला होता.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी वातावरण ढगाळ झाले तर अनेक ठिकाणी पावसाचा सडा पडला. तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या सरी पडल्याने काढणीस आलेला गहू, काढून ठेवलेला शेतातील कांदा, कांदा डेंगळे यासह शेवगा पिकाचा बहर पावसाने झडला आहे. तर काही ठिकाणी जनावरांचा चारा पावसात भिजल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले

एकीकडे तापमानात वाढ झाल्याने सध्या द्राक्ष मालाचे दर वाढले आहेत. अशातच ढगाळ वातावरण व काही ठिकाणी पाऊस झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची धाकधूक वाढली. त्यामुळे टप्प्याटप्प्याने मालाची काढणी करून कामांना वेग आला आहे.

मालेगाव तालुक्यातील शहर व पूर्व भागात पावसाच्या सरी बरसल्याने शेतीमालाचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी वाळत ठेवलेला मका पावसात भिजला. सटाणा तालुक्यात उत्तर भागात, सिन्नर तालुक्यात थेंबांचा शिडकावा झाला. चांदवड तालुक्यात सर्वत्र वातावरण ढगाळ होते मात्र कुठेही दुपारपर्यंत पाऊस झाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

अवेळी पावसाचा फटका

मालेगाव तालुक्यात २० ते २५ मिनिटे पूर्व भागात पाऊस झाल्याने शेवगा उत्पादक शेतकऱ्यांचे फुलोऱ्यातील पिकाचे नुकसान झाले तर काही शेतकऱ्यांनी उपटून ठेवलेला कांदा पावसात भिजला.

यासह अनेक शेतकऱ्यांनी घरगुती कांदा बियाण्यासाठी डेंगळ्यांची लागवड केली होती त्यांचेही कांदा डेंगळे पावसात भिजले. काही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील काढलेला मका ऊन देण्यासाठी पसरवलेला होता मात्र अचानक आलेला पावसात तो भिजला यास जनावरांसाठी साठवलेला चाराही भिजल्याने या वेळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT