Pune News: अनियमित पावसाने ज्वारी पिकाचे गणित कोलमडले आहे. पेरणीचा हंगाम जवळपास संपला असताना केवळ ५९ टक्के क्षेत्रावर ज्वारीची पेरणी पूर्ण होऊ शकली आहे. साधारणतः ऑक्टोबरअखेरपर्यंत काही भागांत ज्वारी पेरली जाते; मात्र यंदा पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना पेरणीची योग्य वेळ साधता आली नाही. परिणामी, ज्वारी उत्पादनात जिल्ह्यात घट होण्याची शक्यता आहे..पुण्यात खरीप हंगामातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर रब्बी हंगामातही अतिवृष्टीने पावसाचे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जमिनींमध्ये ओल होती. त्यामुळे वाफसा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पेरण्या करणे शक्य झाले नाही..ज्वारीची पेरणी साधारण १५ ऑक्टोबरपर्यंत पुण्यातील विविध तालुक्यात होते. त्यानंतरही काही शेतकरी ज्वारीची पेरणी करतात, मात्र त्यातील बहुतांश पीक हे चाऱ्यासाठी वापरण्यात येते. त्यामुळे खाण्यासाठीच्या ज्वारीच्या पेरणीचा कालावधी संपला आहे. पावसाचे प्रमुख कारण असले तरी वाढती मजुरी आणि पाणी उपलब्धतेमुळे शेतकरी इतर पिकांकडे वळले आहेत..Rabi Jowar Sowing: अतिवृष्टीमुळे ज्वारी पेरणीला जमीन प्रतिकूल; शेतकरी हरभरा आणि गव्हाकडे वळले.महत्त्वाचेजिल्ह्यात ८८ हजार ३३७ हेक्टरवर ज्वारीची पेरणी होतेया वर्षी केवळ ५२ हजार ४८८ हेक्टर एवढी झालीयामध्ये सर्वाधिक पुरंदरमध्ये १३ हजार हेक्टरवर एवढ्या क्षेत्रावर पेरणी.‘रब्बी’तील पेरणीज्वारी- ५२,४८८ हेक्टरगहू- ६,९६१ हेक्टरमका- ११,३६४हेक्टर.Rabi Jowar Sowing: पुणे विभागात अवघी ४२ टक्के ज्वारी पेरणी.तालुकानिहाय ज्वारीची पेरणी(पेरणी क्षेत्र हेक्टरमध्ये)हवेली-४५१मुळशी-२१२भोर- ३,०२४मावळ-२६०राजगड- २५.जुन्नर -३,४५०खेड - ९,१३०आंबेगाव -६,८४९शिरूर -६,२१९बारामती -६,६३३इंदापूर -१,२०६दौंड - १,३८०पुरंदर- १३,६५०.साधारण ऑक्टोबरपर्यंत ज्वारीच्या पेरण्या होतात. पुण्यात ज्वारीचे पीक हे मातीच्या ओलाव्यावर घेतले जाते. यावर्षी पाऊस जास्त झाल्याने जलस्रोतांचा साठा वाढला. त्यामुळे मुबलक स्वरूपात पाणी असल्याने शेतकऱ्यांनी इतर पिके घेण्याला अधिक प्राधान्य दिले आहे. नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत काही जण पेरणी करतात, मात्र रोगाचा प्रादुर्भाव अधिक असतो.अजित पिसाळ, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद.ज्वारी हे पीक मुळातच खर्चिक झाले आहे. मजुरी वाढल्याने ज्वारी काढणीला अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच यावर्षी ज्वारीच्या पेरणीच्या वेळी जमिनीतच ओलावा खूप होता. त्यामुळे पेरणी करणे शक्य नव्हते. ज्वारीला दरही चांगला मिळत असल्याने आम्ही दरवर्षी ज्वारी करतो. या वर्षी उशीर झाल्याने फक्त घरी खाण्यासाठी म्हणून थोडी ज्वारीची पेरणी केली आहे.भाऊसाहेब पळसकर, शेतकरी, करडे, ता. शिरूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.