Unseasonal Rain : पुन्हा अवकाळीची शक्यता आहे का? राज्यात अवकाळीच्या पुन्हा चर्चा

Weather Update : राज्यात सध्या उन्हाचा चटका कायम आहे. तर राज्यात काही भागात पुन्हा अवकाळी पावसाची चर्चा आहे. पण याची शक्यताच कमी आहे.
Weather Forecast
Weather ForecastAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात सध्या उन्हाचा चटका कायम आहे. तर राज्यात काही भागात पुन्हा अवकाळी पावसाची चर्चा आहे. पण याची शक्यताच कमी आहे, असे माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले. मागील चार दिवसातील, म्हणजे दि.१६ ते २० मार्च दरम्यान विदर्भातील अवकाळीचे उदाहरण बघता,  प्रत्यक्षात झालेले पर्ज्यन्य आणि गारपीट ही वातावरणीय अपेक्षेप्रमाणे मर्यादित क्षेत्रात व खुपच कमी तीव्रतेची व अंदाजित पूर्वानुमानाला साजेशीच होती.

परंतु प्रत्यक्षात अवकाळीबाबतचा अति टोकाच्या बातम्यांचा धुमाकूळ व घाबरवणारा डांगोराच अधिक पिटवला गेला, असे दिसलें. म्हणून हे उदाहरण दिले. आताही पुन्हा असेच होवु शकते, असे खुळे यांनी सांगितले. सध्याच्या कांदा,काढणी व साठवणीच्या तसेच आंबा, द्राक्षे, डाळिंब, संत्रा इ.फळबागा सौंद्यांच्या व काढणी, पॅकिंगच्या तयारीत तर भरड धान्यांची खळ्यावर धामधूम शेतकरी करत असतांना,  सोशल मीडियावर अवकाळीच्या बातम्यांचा सध्या रोज भडीमार चालु आहे. शेतकऱ्यांना नकळत भेदरवले जात आहे, कि काय, असे वाटू लागले, असेही खुळे यांनी स्पष्ट केले.

Weather Forecast
Weather Update : राज्यात उन्हाचा चटका वाढतोय

सौदे करणारे शेतकरी व व्यापाऱ्यांनी तर अवकाळीच्या अतिरंजित बातम्यांकडे दुर्लक्ष करावे, असेच वाटते. तसेच काही असल्यास मात्र नक्कीच अवगत केले जाईल. गुरुवार दि.२८ ते रविवार ३१ मार्च दरम्यानच्या चार दिवसा(रंगपंचमी व नाथषट्ठी)पैकी फक्त एक-दोन दिवस विदर्भ मराठवाड्यात केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता जाणवेल, असे वाटते.

Weather Forecast
Weather Update : ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज

तसेच शुक्रवार दि.१२ ते गुरुवार दि.१८ एप्रिलपर्यंतच्या) आठवड्यात म्हणजे गुढीपाडवा झाल्यानंतर दोन दिवसांनी ते रामनवमीपर्यंत, मुंबईसह कोकण वगळता खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भातील फक्त काही भागात केवळ ढगाळ वातावरण राहून किंचित तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यामुळे घाबरू तर नयेच, शिवाय अजुन तीन आठवडे हातात असुन शक्य असल्यास शेतकऱ्यांनी शेतकामाचे त्या पद्धतीने नियोजन करता येऊ शकते, असे वाटते. खुप अगोदर आगाऊ सूचना येथे केली आहे. तसेही वातावरणात जर काही बदल झाल्यास तसे सूचित केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पहिले  मार्गस्थ होत असतांनाच मंगळवार दि.२६ मार्चला रात्री नवीन पश्चिमी झंजावात, अतिउत्तर भारतातील पश्चिमी हिमालयीन राज्यात प्रवेशणार असुन तेथे पाऊस बर्फवृष्टी व थंडी जाणवेल. परिणामी महाराष्ट्रातही मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रातील कमाल किमान तापमाने सरासरी इतकी तर काही ठिकाणी सरासरीच्या खाली सध्या अजूनही जाणवत आहे. एल- निनोच्या वर्षात दोन्हीही तापमाने लाभदायक राहून महाराष्ट्रातील रब्बी पिकांना मदत तर केलीच व मार्चअखेरपर्यंत उभ्या पिकांना अजुनही फायदा होत आहे, असेच समजावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com