Unseasonal Rain : विदर्भात अवकाळीचा १४ हजार हेक्‍टरला फटका

Crop Damage : अवकाळी पाऊस, गारपिटीने विदर्भातील शेतकऱ्यांचा पिच्छाच पुरविला असून गेल्या तीन दिवसांत यामुळे सुमारे १४ हजार २६५ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : अवकाळी पाऊस, गारपिटीने विदर्भातील शेतकऱ्यांचा पिच्छाच पुरविला असून गेल्या तीन दिवसांत यामुळे सुमारे १४ हजार २६५ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये सर्वाधिक ९ हजार हेक्‍टर बाधित क्षेत्र एकट्या यवतमाळ जिल्ह्यात असून त्यानंतर नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा फटका बसला.

यवतमाळ जिल्ह्यात सुमारे ९ हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. वाशीम जिल्ह्याचे बाधित क्षेत्र ३३० हेक्‍टर असल्याचे सांगण्यात आले. नागपूर जिल्ह्याच्या नागपूर तालुक्‍यात आठ, कामठी ५३, सावनेर ४६, काटोल ३२, कळमेश्‍वर ४५, रामटेक ३०, पारशिवणी १५, मौदा ६, कुही तालुक्‍यात २० गावे बाधित झाली आहेत.

Crop Damage
Unseasonal Rain : गोंदियाला अवकाळी पावसानं झोडपलं, धान पिकांना फायदा ?

एकूण २५५ गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला. बाधित शेतकऱ्यांची संख ३८११ असून नुकसान क्षेत्र २५१३ हेक्‍टर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १९३ गावांतील २३४१ शेतकरी अवकाळी पावसाच्या परिणामी बाधित झाली. याच्या परिणामी एकूण नुकसान क्षेत्र १३५६.८ हेक्‍टर नोंदविण्यात आले आहे.

Crop Damage
Unseasonal Rain : वादळी पाऊस, गारपिटीने आठ हजार हेक्टरला तडाखा

भंडारा जिल्ह्यात मका, भाजीपाला, फळपिके, गहू, भात या पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ३६४०६ हेक्‍टर एकूण पेरणी क्षेत्र असून त्यापैकी ५५ हेक्‍टर पिकांचे नुकसान नोंदविण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. बाधित शेतकऱ्यांची संख्या १०५ असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील सात पैकी केवळ साकोली तालुक्‍यातच नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. गोंदिया जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या १०५ असून बाधित गावे १७ असल्याचे अहवालात नमूद आहे. त्यामध्ये अर्जुनी तालुक्‍यात सर्वाधीक दहा देवरी चार आणि सालेकसा तालुक्‍यातील तीन गावे आहेत. या तीन तालुक्‍यांत केवळ ३८ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधीक ९ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीची नोंद आहे. त्यानंतर वाशीम जिल्ह्यात सुमारे ३३० हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. प्राथमिक अहवालाअंती पंचनामे होतात. त्यानंतरच अहवाल अंतिम होतो.
- किसन मुळे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती
नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांत सातत्याने गारपीट, पाऊस होत आहे. गोंदिया, भंडारा जिल्ह्यांना देखील अवकाळीचा फटका बसला आहे. सध्या प्राथमिक अहवालाअंती क्षेत्र निश्‍चित करण्यात आले असले तरी त्यात वाढ होण्याची शक्‍यता आहे.
- शंकर तोटावार, प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com