Smart Farm Agrowon
ॲग्रो विशेष

Smart Farm : ‘स्मार्टफार्म’द्वारे हवामान बदलांशी सामना करता येणार

Unnat Bharat Abhiyan Vijay Bhatkar : हवामान बदलांशी सामना करताना शेतकऱ्यांना पाणी, खते, कीटकनाशके यांच्या अचूक वापरातून उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होणार आहे,’’ असे प्रतिपादन संगणक शास्त्रज्ञ आणि केंद्र सरकारच्या उन्नत भारत अभियानाचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर यांनी केले.

Team Agrowon

Pune News : ‘‘नवयुवकांच्या संकल्पनेतून नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘सीडॅक’च्या त्रिवेंद्रमच्या केंद्रातून ‘स्मार्टफार्म’ची अनोखी भेट मिळाली आहे. या तंत्रज्ञानातून हवामान बदलांशी सामना करताना शेतकऱ्यांना पाणी, खते, कीटकनाशके यांच्या अचूक वापरातून उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होणार आहे,’’ असे प्रतिपादन संगणक शास्त्रज्ञ आणि केंद्र सरकारच्या उन्नत भारत अभियानाचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर यांनी केले.

प्रगत संगणन विकास केंद्र अर्थात ‘सीडॅक’च्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (ता. ९) आयोजित कार्यक्रमात डॉ. भटकर बोलत होते. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University) कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालिका सुनीता वर्मा, ‘सीडॅक’चे महासंचालक ई मंगेश, कार्यकारी संचालक ए. के. नाथ आदी उपस्थित होते.

प्रगत संगणन विकास केंद्र अर्थात ‘सीडॅक’च्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (ता. ९) आयोजित कार्यक्रमात डॉ. भटकर बोलत होते. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालिका सुनीता वर्मा, ‘सीडॅक’चे महासंचालक ई मंगेश, कार्यकारी संचालक ए. के. नाथ आदी उपस्थित होते.

‘एनसीएल’चे संचालक डॉ. लेले यांनी ‘ग्रीन हायड्रोजन संधी’बाबत सादरीकरण केले. कृषी क्षेत्रातील जैवकचरा आणि कृषी उत्पादनातील टाकाऊ वस्तूंपासून ग्रीन हायड्रोजन (Green hydrogen) निर्मिती शक्य आहे. यातून देशात १८ ते २० गिगावॅट वीजनिर्मिती करणे शक्य आहे. यावर संशोधन सुरू असून, भविष्यात पुण्याची वाटचाल हायड्रोजन व्हॅली इनोव्हेशन क्लस्टर कडे होत आहे,

असे त्यांनी सांगितले. या वेळी बदलते हवामान, तापमान, आद्रता, पाऊस, मृदा परीक्षणाच्या सूचना आणि उपयोजनात्मक माहिती देणाऱ्या ‘स्मार्टफार्म’चे अनावरण करण्यात आले. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना कमी संसाधनांचा वापर करून अधिक कार्यक्षम उत्पादन करण्यास मदत होणार आहे.

मी व्यावसायिक शेतकरी नसून, हौशी शेतकरी आहे. परम सुपर संगणक निर्मिती करताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा कृषिक्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी कसा फायदा होऊ शकतो, याचा विचार मी नेहमी करत होतो. त्या विचारातून शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी हवामान विभागाला सुपर संगणकाचा उपयोग झाला.
डॉ. विजय भटकर.

‘स्मार्टफार्म’ची वैशिष्ट्ये...

तापमान, आद्रता, कार्बन डायऑक्साईड, मृदेतील पोषण मूल्यांचे संवेदकामार्फत नोंदणी

तास, दिवस, आठवडा, महिना, वर्षभराच्या पाण्याचे आणि खतांचे पूर्वनियोजन करता येणार

टच स्क्रीनद्वारे शेतकऱ्यांना उत्तम माहिती मिळणार

स्वयंचलित पद्धतीने आणि रिमोट कंट्रोलद्वारे वापरता येतो

मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे माहिती मिळते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT