Rabi Season : बदलते वातावरण; रब्बीला फटका

Rabi Crop : दहा बारा दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. या बदलत्या वातावरणाचा मोठा फटका रब्बी पिकांना बसला आहे.
Rabi Crop
Rabi CropAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : दहा बारा दिवसांपसून तालुक्यात ढगाळ वातरण आहे. या बदलत्या वातावरणाचा मोठा फटका रब्बी पिकांना बसला आहे. रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव अधिक झाल्याने तालुक्यातील ११ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावरील हरभरा पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

यंदा पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांना साधला नाही. दुष्काळी स्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम घेण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे रब्बी हंगामाचे क्षेत्र पेरणीविना पडकी राहिले आहे. परंतू, ज्यांच्याकडे सिंचनाच्या सुविधा आहेत, अशा शेकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली आहे.

Rabi Crop
Rabi Sowing : दुष्काळी सिन्नरला रब्बीचा सर्वाधिक पेरा

यात प्रमुख पीक असलेल्या हराभऱ्याची सुमारे ११ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. खरीप हंगाम पदरात पडला नाही. किमान रब्बी हंगाम तरी साधेल, या आशेने शेतकऱ्यांनी दिवसरात्र काबडकष्ट करून हरभरा पीक जगवले. परंतू, दहा बारा दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हरभऱ्यावर घाटेअळी व मररोगाचा प्रादुर्भाव मठ्या प्रमाणात झाला आहे.

Rabi Crop
Rabi Season : रब्बीतील १ लाख ३० हजार हेक्टरवर ई-पीकपाहणी

घाटेअळी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र, अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकऱ्यांना महागाडी औषध फवारणी करण्याचा आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. खरिपात केलेला खर्च निघाला नाही. आता बदलत्या वातावरणामुळे रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.

पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला. रब्बी हंगामावर आशा होती. परंतू, ढगाळ वातावरणामुळे आशाही जवळपास मावळण्याची शक्यता असल्यामुळे आर्थिक गणित बिघडणार आहे. शानाने दुष्काळी अनुदान देऊन शेकऱ्यांना मदतीचा हात द्यावा.
प्रकाश चंदनशिवे, शेतकरी, नागूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com