Pune News : चासकमान कालव्याचे आवर्तन सोडल्यामुळे रांजणगाव परिसरात तुर्तास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. शिरूर तालुक्यात रांजणगाव परिसरात गेले. अनेक दिवसांपासून चासकमान कालव्याचे पाणी आले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात रांजणगाव परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय टळली आहे.
शेतीसाठी ही पाणी वापरण्यास मिळाल्यामुळे नगदी पिके, भाजीपाला, उन्हाळी भुईमूग, बाजरी आदी पिके घेण्याची संधी मिळाली. त्यातच पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. तीन महिन्यांपासून चासकमान कालव्याचे पाणी शिरूर तालुक्यामध्ये आले आहे. त्यामुळे शिरूर (Shirur) तालुक्यातील शेतीला सध्या मुबलक असा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
शिरूर तालुक्याच्या शिवारात चासकमान व डिंभा कालव्याचे पाणी आले आहे. याच पाण्यावर तालुक्यातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची भिस्त अवलंबून आहे. मात्र, पुणे-नगर महामार्गालगतच्या कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, कोंढापुरी, रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवी, सरदवाडी ते शिरूर या पट्ट्यात औद्योगिकीकरणासह नागरिकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिमाणी जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे.
पाणीपुरवठा योजनांना फटका बसणार
चासकमान कालव्याच्या पाण्यावरून कधी ‘टेल टू हेड’ व ‘हेड टू टेल’ असा वाद निर्माण होत आहेत. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून शिरूर तालुक्यात लहान-मोठ्या गावांमध्ये शेकडो कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत.
मात्र, अडातच नाही तर पोहोऱ्यात कुठून येणार’ याप्रमाणे या पाणीपुरवठा करणाऱ्या योजना ज्या पाणवठ्यांवर अवलंबून आहेत. ते पाणवठेच उन्हाळ्यात कोरडे ठाक पडतात. या योजनांना पाणी कसे उपलब्ध होणार, हा प्रश्न शेतकरी, गावकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.