Pune News: गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील काही महिन्यात नारळाला मोठी मागणी वाढली आहे. गेल्या सात महिन्यांत १४ लाख ६१ हजार ५६० किलो नारळाची आवक झाली असून, त्यातून तब्बल ३ कोटी ४६ लाख ५५ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मोठी उलाढाल झाली असल्याचे बाजार समितीतीकडे असलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. .मार्केट यार्डातील भुसार बाजारात साधारणपणे एक ते दोन हजार पोती नारळाची आवक होते. तर सणाच्या काळामध्ये ३ ते ४ हजार पोती नारळांची आवक होते. एका पोत्यात १०० नारळ असतात. एका पोत्याचे वजन सुमारे ४० ते ७० किलो असतो. सणाच्या काळात किरकोळ विक्रेत्यांकडून २५ ते ३० टक्क्यांनी मागणी वाढली होती..APMC Market Committee: बाजार समितीत सत्तांतरानंतर १२ कोटींचा भ्रष्टाचार.सध्या मागणीत घट झाली असली तरी मार्केटमध्ये नारळाला चांगले दर आहेत. तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ही प्रमुख नारळ उत्पादक राज्ये असून, येथून संपूर्ण देशात नारळाचा पुरवठा होतो. त्यातच गोटा खोबरे, खोबरेल तेलासह विविध प्रक्रिया उद्योगांकडून नारळाला नेहमीची मागणी आहे. त्यामुळे नारळाचे भाव चढे आहेत..नवरात्र, दसरा, दिवाळी च्या काळात नारळाला देशात मागणी वाढली होती. पुणे शहर व जिल्ह्यात उत्सव काळात दररोज साधारण ३ लाख नारळांची विक्री होत होती. सध्या गुलटेकडी मार्केटमध्ये नारळाची आवक वाढली असून, दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत दर्जानुसार ३० ते ६० रुपयांवर पोहोचली आहे. दरात मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाल्याने ग्राहकांना नारळासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत..Marketing Director: पणन संचालकपदी कोण,कदम, खंडागळे की गिरी? .हॉटेल, केटरिंगकडून मागणीउत्सव काळात उपवासाच्या खाद्यपदार्थांची मागणी वाढते. त्यामुळे हॉटेल, केटरिंग व्यावसायिक, तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून नारळांच्या मागणीत वाढ होते. सापसोल, मद्रास या जातीच्या नारळांचे खोबरे चवीला गोड असते. त्यामुळे त्याला मोठी मागणी आहे..नारळाचा प्रकार -- शेकड्याचा भाव (दर्जानुसार रुपये)--- कशासाठी होतो वापर?नवा नारळ --- २००० ते ३२०० --- देवासाठीमद्रास --- ४००० ते ५००० --- खाद्यपदार्थ बनविणेपालकोल --- २५०० ते ३४०० --- किरकोळ विक्रीसाठीसापसोल मोठा --- ४५०० ते ५६०० -- खाद्यपदार्थ बनविणेसापसोल मध्यम --- २५०० ते ३८०० --- खाद्यपदार्थ बनविणे.पुणे कृषी बाजार समितीत झालेली नारळाची आवक व उलाढाल :महिना -- आवक (किलोमध्ये) --- उलाढाल (रुपयांमध्ये)एप्रिल --- १,५१,२७५ --- ३०,०९,५००मे --- १,६८,९३५ --- ३०,७६, ६५०जून --- २,६८,०६५ --- ५८,४६,९२५जुलै --- १,७१,२३५ --- ४४,५१,७३७ऑगस्ट --- २,५२,१०० --- ६५,७९,०८७सप्टेंबर --- २,५९,३०० --- ६७,४३,९७०ऑक्टोबर --- १,९०,६५० -- ४९,४७,५००.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.