Agriculture Irrigation : शेती सिंचनासाठी तिसगाव धरणावर जलमापकांद्वारे पाणी वितरण

Distribution of water through water gauges : नाशिक जिल्ह्यातील तिसगाव धरणावर १०० टक्के लाभधारक हे जलसंपदा विभागाच्या परवानगीने उपसा पद्धतीने पाणी वापरतात. या धरणावर उपसा सिंचनाच्या पाइपलाइनवर २०५ जलमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत.
Water Supply
Water SupplyAgrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील तिसगाव धरणावर १०० टक्के लाभधारक हे जलसंपदा विभागाच्या परवानगीने उपसा पद्धतीने पाणी वापरतात. या कामकाजात सुसूत्रता व पारदर्शकता येण्यासाठी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणअंतर्गत पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिकअंतर्गत स्थापन झालेल्या तिसगाव धरण ठिबक उपसा सिंचन महासंघामार्फत तिसगाव धरणावर उपसा सिंचनाच्या पाइपलाइनवर २०५ जलमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत.

त्यामुळे येथे कार्यक्षम शेती सिंचन होऊन पाणी वापराप्रमाणेच पाणीपट्टी आकारली जाणार आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियम प्राधिकरण (मुंबई) यांच्या २९ मार्च २०२२च्या परिपत्रकानुसार सर्व सिंचन, बिगर सिंचन तसेच शासनमान्य संस्था यांनी जलमापक यंत्र (वॉटर मीटर) बसविण्याच्या सूचना आहेत.

तिसगाव धरण परिसरात १२ गावे लाभधारक असून, त्यांनी कामकाज व समन्वयासाठी ७ पाणी वापर संस्था स्थापन केल्या आहेत. २९ फेब्रुवारी २०२२ रोजी या संस्थांनी एकत्र येत ‘तिसगाव धरण उपसा सिंचन महासंघ’ स्थापन केला आहे. येथील शेतकऱ्यांना पाण्याच्या वापरानुसार पाणीपट्टी येण्यासह पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी जलमापक यंत्र बसवण्याचा प्रारंभ नुकताच करण्यात आला.

या प्रसंगी नाशिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक महेंद्र आमले, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत, शाखाधिकारी भूषण दंडगव्हाळ, सचिन कामाले, विकास आहिरे, प्रवीण वालझाडे यांसह अधिकारी, कर्मचारी तिसगाव धरण ठिबक उपसा सिंचन महासंघाचे अध्यक्ष माणिकराव पाटील, राजू सोनावणे, उपाध्यक्ष अशोकराव भालेराव, बबनराव भालेराव व तिसगाव धरण उपसा सिंचन महासंघाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Water Supply
Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

१०० टक्के लाभधारक करणार वापर

तिसगाव मध्यम प्रकल्पाचा उपयुक्त पाणीसाठा ४५१ दलघफू असून एकूण सिंचन क्षेत्र १२०० हेक्टर आहे. ८११ लाभधारकांमार्फत ४५० विद्युतपंपद्वारे मंजूर कोट्याप्रमाणे पाण्याचा उपसा होतो. पाणी वापरावर पूर्णपणे नियंत्रण व पाण्याचा कार्यक्षम वापर व एक एक थेंब पाण्याचा पाणीपट्टीच्या स्वरूपात हिशेब यांसह पारदर्शक कामकाजासाठी सर्व लाभधारकांसोबत वेळोवेळी जनजागृती करण्यात आली.

त्यानुसार जलमापकांचा वापरासाठी ते कार्यान्वित करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. या कामी लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव संजय बेलसरे यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. लाभधारकांनी एकाचवेळी मागणी केल्यामुळे ५०,००० किमतीचे हे जलमापक २१,००० रुपयांत देण्याचे कंपनीने मान्य केले आहे. दुसऱ्या वर्षापासून ११०० रुपये प्रति वर्ष (९१.६६ रुपये प्रति महिना) भाडे आकारण्यात येणार आहे.

लाभधारकांनी स्वखर्चाने ४५० जलमापक यंत्र बसविण्याचा निर्णय घेऊन लाभधारकांमार्फत आजमितीस मीटर बसविण्याची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. पुढील ५ वर्षांचा प्रत्येक मीटरचा पूर्ण देखभाल कंपनीमार्फत केले जाणार. त्या बदल्यात जळमापक उत्पादक कंपनी लाभधारकांकडून कोणतेही दर आकारणार नाही.

Water Supply
Water Meter Objection : पाणीपट्टी वाढीमुळे, जलमापक यंत्रांना विरोध

जलमापकाची ही आहेत वैशिष्ट्ये :

जलमापकामध्ये बॅटरी अंतर्भूत असल्याने विद्युत जोडणीची गरज नाही.

पूर्णपणे डिजिटल स्वरूपात माहिती (डॅशबोर्डसहित) शेतकरी, महासंघ व अधिकारी वर्ग यांना प्राप्त होणार.

विद्युतपंपाद्वारे प्रत्येक दिवशी किती लिटर पाण्याचा उपसा झाला ही अचूक माहिती प्राप्त होऊ शकेल.

पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासह पाणीपट्टी येणार आहे.

वॉटर मीटरच्या जोडणीमुळे धरणातील पाणी वापरावर पूर्णपणे नियंत्रण राहणार असून, पाण्याचा कार्यक्षम व मंजूर कोठ्यानुसार पाणी वापर होणार आहे. उपसा सिंचन संस्थांमार्फत लाभधारकांसाठी १०० टक्के वॉटर मीटर बसविणारा राज्यभरातून पालखेड विभागांतर्गत तिसगाव मध्यम प्रकल्प हा पहिलाच प्रकल्प ठरला आहे.
वैभव भागवत, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग
‘प्रत्येक थेंब अधिक पीक’ या सूत्राने पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी सर्व लाभक्षेत्रातील शेतकरी आग्रही आहेत. इतर सिंचन प्रकल्पात प्रवाही पद्धतीने पाणी दिले जाते तर आमच्या महासंघाच्या माध्यमातून सर्व लाभधारक उपसा पद्धतीने पाणी वापर करतात. त्यामुळे पाण्याच्या वापरानुसार योग्य देयक व वापरलेल्या पाण्याची माहिती होण्यासाठी हे जलमापक उपयुक्त ठरणार आहेत. या माध्यमातून पारदर्शकता वाढणार असून काटेकोर पाणी वापर होणार आहे. त्यामुळे सभासदांचे या पद्धतीने वापरासाठी सहकार्य मिळत आहे.
माणिकराव पाटील, अध्यक्ष, तिसगांव धरण ठिबक उपसा सिंचन महासंघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com