Agriculture Irrigation : ‘शेतकरी, पाणीवापर संस्थांनी रविवारपर्यंत अर्ज करावेत’

Irrigation Department : पाण्याचा लाभ घेण्याकरिता आपले अर्ज रविवारपर्यंत (ता. १२) सायंकाळी ६.१५ पर्यंत नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon

Nashik News : नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील गोदावरी उजवा व डावा तट कालवा या ठिकाणावरून प्रवाही व उपसा सिंचनाने पाणी घेण्यासाठी इच्छुक लाभार्थी शेतकरी व पाणी वापर संस्थांनी उन्हाळ हंगाम २०२३-२४ साठी पाण्याचा लाभ घेण्याकरिता आपले अर्ज रविवारपर्यंत (ता. १२) सायंकाळी ६.१५ पर्यंत नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले.

धरण क्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन ठराविक क्षेत्रापर्यंत नमुना नंबर ७ प्रवर्गात उन्हाळ हंगाम २०२३-२४ संरक्षित सिंचनाकरिता विहिरींच्या पाण्याची जोड असणाऱ्या ऊस व फळबाग या पिकांसाठी पाणी देण्यात येणार आहे. धरणातील उपलब्ध असलेले पाणी हे उन्हाळ हंगाम अखेरपर्यंत (३० जुलै २०२४) पुरवावे लागणार असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन उर्वरित पाण्याचा शेती पिकांसाठी व औद्योगिक कारखाने यांना पुरवठा करण्यात येणार आहे.

Agriculture Irrigation
APMC Market : व्यापाऱ्यांचा माल ओट्यांवर, तर शेतकऱ्यांचा रस्त्यावर

पाणीपुरवठा सुलभ व्हावा यासाठी मंजूर क्षेत्रातील उभ्या पिकांना पाणी घेताना शेतकऱ्यांनी पाणी काटकसरीने घ्यावे. पाणीपुरवठ्यामुळे होणाऱ्या पीक नुकसानीची जबाबदारी ही त्या शेतकऱ्याची व्यक्तीश: असणार आहे. यासाठी शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही.

पाटमोट संबंध तसेच जास्त लांबणीवार/उफडा क्षेत्रास पाणी नाकारण्याचे अधिकारी क्षेत्रीय अधिकारी यांना आहेत. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी वापर करताना सूक्ष्म सिंचनावर भर देऊन, मंजूर क्षेत्राच्या नादुरुस्त पोटचाऱ्या लोकसहभागातून ताबडतोब दुरुस्त करून घ्याव्यात. नादुरुस्त पोटचाऱ्यांमुळे पाणी पुरवठ्यास अडथळा निर्माण होऊन, पिकांचे नुकसान झाल्यास तसेच उपलब्ध पाणीसाठ्यानुसार आवर्तन कालावधीमध्ये कमी जास्त अंतराने पाणीपुरवठा झाल्याने पिकांचे काही अपरिहार्य कारणाने पाणी कमी मिळून नुकसान झाल्यास त्याबाबत शासनाकडून कुठलीही नुकसान भरपाई मिळणार नाही, याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

Agriculture Irrigation
Animal Ear Tagging : यापुढे ‘इअर टॅगिंग’शिवाय जनावरांची खरेदी-विक्री नाही

पाणी चोरी केल्यास कारवाई

ज्यांच्या नावाचा समावेश काळ्या यादीत करण्यात आला आहे व ज्यांच्याकडे थकबाकी आहे, अशा लाभार्थ्यांना मंजुरी दिली जाणार नाही. तसेच कालव्यावरील मंजूर उपसाधारकांव्यतिरिक्त इतर कुणीही इलेक्ट्रिक मोटारी, ऑईल इंजिन ठेवून अथवा पाइपलाइनद्वारे पाणी घेण्याचा प्रयत्न करू नये, असे निदर्शनास आल्यास संबंधितांवर सिंचन अधिनियम १९७६ मधील नियमानुसार कार्यवाही केली जाईल, असेही शहाणे यांनी कळविले आहे.

बंदिस्त शेडमध्ये लिलाव

नामपूर बाजार समितीमध्ये मजूर टंचाई, पावसाळी वातावरण आदी कारणांमुळे कांद्याचे लिलाव रविवारपर्यंत बंद असल्याने मोसम खासगी मार्केटमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. गुरुवारी (ता. ९) सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. तेथील बंदिस्त शेडमध्ये लिलाव प्रक्रिया झाल्याने शेतकऱ्यांची सोय झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com