Mumbai News: बारदान्याअभावी रखडलेल्या सोयाबीन खरेदीच्या पार्श्वभूमीवर पणन मंडळाच्या १६० कोटींच्या ठेवी मोडण्याचे आदेश पणनमंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी (ता.१९) दिले. १५ नोव्हेंबरपासून राज्यात सोयाबीन खरेदी सुरू केली आहे. मात्र, बारदान्याचा तुटवडा असल्याने खरेदी थंडावली आहे. .दरम्यान, नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाकडून (एनसीसीएफ) प्रत्येकी २५ लाख असा ५० लाख बारदाना खरेदी केला आहे, तो सोमवारी येईल. उर्वरित प्रत्येकी ५० लाख म्हणजे एक कोटी बारदाना पुरवठा दोन्ही एजन्सींकडून होणार असल्याची माहिती पणन विभागाचे सहसचिव विजय लहाने यांनी दिली..Jaykumar Rawal: पणन विभागाची पुनर्रचना काळाची गरज : पणनमंत्री रावल.राज्यातील हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी याआधी पणन महासंघ बारदाना खरेदी करत होते. मात्र, या वर्षीपासून राज्य सरकार पणन मंडळाकडून ही खरेदी करणार आहे. बारदान्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफचा दर ८० रुपये प्रतिनग दर निश्चित करण्यात आला होता. मात्र, या दराची एकही निविदा आली नाही..Gunny Bag Supply Scam: धान खरेदीत बारदाना पुरवठ्यात २५ लाखांचा गैरव्यवहार उघड!.या दराच्या जवळपास म्हणजे प्रतिनग ८९ रुपयांची निविदा भरलेल्या ठेकेदाराला ८० रुपये दराने पुरवठा करण्याची सूचना दिली आहे. मात्र, ठेकेदार ८० रुपयांनी पुरवठा करण्यास तयार नाही. त्यामुळे बारदाना खरेदी रखडली आहे..दरम्यान यावर उपाय शोधण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून पणन मंडळ बारदाना खरेदीसाठी १६० कोटी रुपयांच्या ठेवी मोडणार आहे. नाफेड आणि एनसीसीएफ कालांतराने याची प्रतिपूर्ती करेल. तोवर या ठेवी मोडणार आहे. राज्यात सध्या ७१३ केंद्रांपैकी ४७९ केंद्रावर खरेदी सुरू आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.