Chilli Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Chilli Crop : डहाणूत मिरची बागायतदार संकटात

Climate Change Agriculture Crisis : सध्या वातावरण बदलामुळे अनेक बागातदारांवर संकट उभे ठाकले आहे. अनेक मिरची पिकांची वाढ खुंटत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत.

Team Agrowon

Kasa News : डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात मिरची उत्पादक शेतकरी आहेत. यात साधी मिरची व ढोबळी मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात काढले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ८०० हेक्टर साधी मिरची, तर २५० हेक्टर भोपळी मिरचीचे उत्पादन केले जाते.

भोपळी मिरची, विविध फुले यासाठी तर तंबू बांधले जातात. त्यावर शेतकरी मोठा खर्च करतात; पण सध्या वातावरण बदलामुळे अनेक बागातदारांवर संकट उभे ठाकले आहे. अनेक मिरची पिकांची वाढ खुंटत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत.

डहाणू तालुक्यात सध्या मोठमोठे प्रकल्प सुरू आहेत. रेल्वे रुंदीकरण, बुलेट ट्रेन, बडोदरा एक्सप्रेस, वाढवण बंदर यांची कामे सुरू असून, मोठ्या प्रमाणात खोदकाम, बांधकामे केली जात आहेत. अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते.

अनेक ठिकाणी बांधकामासाठी लागणारी खडी रेती, रेडीमिक्स काँक्रीट तयार करणारे प्लांट उभे टाकले आहेत. यातून मोठ्या प्रमाणात धूलिकरण हवेद्वारे बाहेर पडत आहेत. अनेक ठिकाणी गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि वाहतूक होत आहे.

यामुळे येथील वातावरणात मोठा बदल झाला आहे. याचा परिणाम येथील पारंपरिक पिके, चिकू, मिरची, लीली फुले यांची वाढ खुंटत आहे. अनेक रोपांची वाढ खुंटल्यामुळे बागायतदार चिंतेत आहेत.

सध्या वातावरण बदलामुळे अनेक बागायतदारांच्या पिकांवर परिणाम होत आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी पर्यावरण शास्त्रज्ञांची एक टीमदेखील येथील भागात पाहणी करून अभ्यास करत आहे. सध्या या भागात मोठ्या प्रमाणावर लागवड केलेल्या मिरची पिकावर रोग पडल्याने मोठे नुकसान होत आहे.
रघुनाथ सुतार, मिरची उत्पादक शेतकरी, साखरे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT