Mahayuti Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Election : मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांचे अर्ज दाखल

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी एकच दिवस शिल्लक असल्याने राज्यातील बहुतांश नेते आणि इच्छुकांनी सोमवारी (ता. २८) अर्ज दाखल केले.

Team Agrowon

Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी एकच दिवस शिल्लक असल्याने राज्यातील बहुतांश नेते आणि इच्छुकांनी सोमवारी (ता. २८) अर्ज दाखल केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, अमित ठाकरे, गणेश नाईक, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, रोहित पवार, शिवेंद्रराजे भोसले यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारपर्यंत (ता. २९) आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागावाटपाचा घोळ अद्याप सुरू असून सोमवारी काही नावांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अनेक उमेदवारांत धाकधूक होती. सोमवारी सकाळी काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली.

सोमवारी (ता. २८) सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाचपाखडी मतदार संघात जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. त्याआधी आनंदमठात जाऊन त्यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच कुटुंबीयांसह जाऊन त्यांनी अर्ज दाखल केला. बारामतीतून अजित पवार यांनीही शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. तसेच त्यांच्याविरोधात पुतणे युगेंद्र पवार यांनीही अर्ज दाखल केला. या वेळी शरद पवार यांची उपस्थिती होती.

माहीममधून उमेदवारी जाहीर केलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित यांनी रॅली काढत अर्ज दाखल केला. तसेच शिंदे सेनेचे सदा सरवणकर यांनीही अर्ज दाखल केला. वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई, अणुशक्तीनगरमधून सना मलिक विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

माजी मंत्री गणेश नाईक ऐरोलीतून तर त्यांचे पुत्र संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बेलापूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT