Pune News : भाजपने नुकताच ९९ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. यानंतर सोमरवारी (ता. २१) तिसऱ्या म्हणजेच परिवर्तन महाशक्ती आघाडीने पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपल्या उमेदवारांची नावांची घोषणा केली. राज ठाकरे यांनी मुंबईत नावांची घोषणा केली. तर अजित पवार यांनी आज १७ एबी फार्मचं वाटप केले असून भरत गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार) आपल्याला उमेदवारी दिल्याचा दावा केला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारण चांगलेच तापलेलं आहे. महायुतीत जागा वाटपावरून बैठकांना जोर आला असताना भाजपने आपल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर करत आपणच येथे बॉस असल्याचे दाखवून दिले आहे. तर महाविकास आघाडीत मराठवाड्यातील १२ जागावरून जोरदार सस्सीखेच होत आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत वितुष्ठ आले आहे. अजित पवार यांनी १७ जणांना एबी फार्मचे वाटप करताना बंडखोरी होणार नाही यांची काळजी घेतली आहे. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट दिल्लीतून उमेदवारांची यादी मंगळवारी (ता.२२) जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
याचदरम्यान प्रहार संघटनेचे नेचे आमदार बच्चू कडू, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत पहिली यादी जाहीर केली. 'परिवर्तन महाशक्ती' आघाडीने पहिली यादीत १० उमेदवारांचा समावेश केला आहे. यात अचलपूर, रावेर, चांदवड, राजुरा, एरोली, देंगलुर, शिरोळ आणि मिरज मतदारसंघाचा समावेश आहे. मिरज आणि शिरोळ हे दोन मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आले असून राजू शेट्टी कार्यकर्त्यांशी बोलून नावे घोषित करतील.
अचलपूरमधून बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे. प्रहारच्या अनिल चौधरी (रावेर), गणेश निंबाळकर (चांदवड) आणि सुभाष साबणे (बिलोली) यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून अंकुश सखाराम कदम (ऐरोली), माधव दादाराव देवसरकर (हदगाव हिमायतनगर)आणि गोविंदराव सयाजीराव भवर यांना (हिंगोली) आणि स्वतंत्र भारत पक्षाला राजुरा मतदार संघ सोडण्यात आला असून येथे वामनराव चटप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीने दिले १७ जणांना एबी फॉर्म
यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीकडून भरत गावित यांच्या नावाची घोषणा करत पहिला उमेदवार जाहीर केला आहे. गावित यांनी अजित पवार यांची देवेगिरी बंगल्यावर भेट घेतली होती. यावेळी आपल्याला उमेदवारी मिळाल्याचा दावा गावित यांनी केला आहे. तसेच अजित पवार यांनी अनेक सूचना केल्या असून २४ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले. यावेळी सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने १७ जणांना एबी फॉर्म वाटप केले आहे. तर कोणत्याही क्षणी ते आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करू शकतात.
मनसेकडून दोघांची उमेदवारी जाहीर
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन उमेदवारांची नावे घोषित केली. ठाकरे यांनी डोंबिवलीत राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करताना राजू पाटील आणि अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर केली. तर मनसेची उर्वरित यादी आज किंवा उद्या येणार जाहीर केली जाईल असेही त्यांनी सांगताना आपण उमेदवारी फार्म भरण्यासाठी येणार असल्याचेही सांगितले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.